दिल्लीच्या IGI विमानतळावर आणीबाणी जाहीर! मॉस्कोला जाणाऱ्या विमानातून धूर निघाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 3:50 वाजता बँकॉकहून मॉस्कोला जाणाऱ्या एरोफ्लॉट फ्लाइट एसयू SU 273 च्या केबिनमधून धूर निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून मॉस्कोला जाणाऱ्या एरोफ्लॉटच्या फ्लाइट SU 273 मध्ये सुमारे 425 प्रवासी होते. विमानाच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
हेही वाचा- मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन
हेही वाचा- पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार! मोठी घोषणा करण्याची शक्यता
विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था -
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मंगळवारी विमानातून धूर निघत असल्याचे दिसून आल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची विशेष पद्धतीने तपासणी केली जात आहे.