राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) 15 ऑगस्ट 2025

FASTag Annual Pass : संपूर्ण वर्षासाठी टोल टॅक्समधून सूट ; 15 ऑगस्टपासून मिळणार फास्ट टॅगचा वार्षिक पास, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

fast tag annual pass

लवकरच भारतातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर फास्टॅग वार्षिक पासची सुविधा सुरू केली जाईल. पण ही सुविधा कशी सक्रिय केली जाईल? वार्षिक फास्टॅग पासचा काय फायदा होईल? याबद्दल आता आपण जाणून घेऊया. 

त्यामुळे तुम्हाला आता फास्ट टॅग पुन्हा पुन: रिजार्च करण्याची गरज पडणार नाही. हा फास्ट टॅग वार्षिक पास प्रीपेड टोल पास असेल. हा पास एकदा खरेदी केलात की तो वर्षभर किंवा तुमचे दोनशे प्रवास पूर्ण होईपर्यंत वैध राहील. यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा 3 हजार रुपये भरायचे आहेत. म्हणजेच 3 हजार रुपये भरून तुम्हाला दोनशे प्रवास करता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एका प्रवासाला फक्त 15 रुपये मोजावे लागतील. मात्र तुमचे दोनशे प्रवास संपले की पासचं पुन्हा नूतनीकरण करावं लागेल. दुसरं म्हणजे हा पास खासगी गाड्यांसाठी आहे. टॅक्सी किंवा व्यावसायिक वाहनांसाठी वापरता येणार नाही.  म्हणजेच फास्ट टॅग वार्षिक पास फक्त नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्स्प्रेसवेर लागू आहे. यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे.  

फास्ट टॅग वार्षिक पास तुम्ही कसा खरेदी कराल?

हा पास खरेदी करणं खूपच सोपं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही पास काढू शकता. यासाठी Rajmarg Yatra (हायवे यात्रा) अ‍ॅप किंवा NHAIच्या वेबसाईटवरून हा पास ऑनलाईन खरेदी करू शकता. पहिल्यांदा Rajmarg Yatra अ‍ॅप उघडा किंवा NHAI/MoRTH पोर्टलवर जा. तेथे गेल्यावर तुमच्या गाडीची माहिती आणि FASTag ची डिटेल्स भरा. तसंच फास्ट टॅग तुमच्या गाडीच्या विंडशील्डवर व्यवस्थित चिपकलं आहे की नाही याची खात्री करा तसंच तुमची गाडी ब्लॅकलिस्टेड नाही याबद्दल माहिती  तुम्ही 3 हजार भरले की पुढच्या दोन तासात फास्ट टॅग वार्षिक पास सुरू होईल. याची तुम्हाला SMS द्वारे माहितीही मिळेल. हा पास नॉन-ट्रान्सफरेबल आहे. त्यामुळे अन्य गाड्यांसाठी वापरता येणार नाही. 

टोल प्लाझावर एक क्रॉसिंग म्हणजे एक ट्रिप आणि तुम्ही जाऊन पुन्हा आलात तर दोन ट्रिप मोजल्या जातील. मात्र लक्षात ठेवा की हा पास फक्त नॅशनल हायवे आणि नॅशनल एक्स्प्रेसवेवरील टोल प्लाझावर लागू आहे. राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांच्या टोलवर वेगळं शुल्क आकारू शकतं. फास्ट टॅग वार्षिक योजना ही तुमचा प्रवास सुखाचा आणि स्वस्त करण्याची संधी आहे. 15 ऑगस्ट i2025 पासून तुम्ही Rajmarg Yatra अ‍ॅपवर जाऊन हा पास बुक करू शकता.