Who Invented Lift In India: भारतामध्ये लिफ्टचा शोध कोणी लावला? जाणून घ्या
आधुनिक तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये लिफ्टचाही उल्लेख केला जातो. मुळात लिफ्टचा शोध 1852 मध्ये एलिशा ओटिस (Elisha Otis) यांनी शोधून काढली होती, ज्यांनी न्यू यॉर्क शहरातील क्रिस्टल पॅलेस प्रदर्शनात त्याच्या सुरक्षा ब्रेकचे प्रात्यक्षिक दाखवले होते. त्यांच्या यंत्रणेमुळे लिफ्टमध्ये सुरक्षितता यंत्रणा (Safety Brake System) जोडली गेली, ज्यामुळे लिफ्ट अपघात होण्याची शक्यता कमी झाली. त्यानंतर, 1857 मध्ये न्यू यॉर्कमधील हाऊउट डिपार्टमेंट स्टोअरमध्ये पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली होती. सध्याच्या युगात, लिफ्ट सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला असेल, ज्याप्रमाणे लिफ्टचा शोध अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात झाला, त्याचप्रमाणे भारतात लिफ्टचा शोध कधी आणि कोणी केला असावा? याबद्दलचा इतिहास पाहणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
भारतात लिफ्टचा शोध सर्वप्रथम 'या' ठिकाणी झाला होता:
भारतामध्ये लिफ्टचा प्रवेश ब्रिटिश काळात झाला होता. 1982 मध्ये, भारतात सर्वप्रथम लिफ्ट कोलकाता (त्यावेळी कलकत्ता) येथील राजभवन (सरकारी भवन) मध्ये बसवण्यात आली होती असे मानले जाते. त्या काळात, भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे औद्योगिक क्रांतीदरम्यान लिफ्टचा वापर भारतात सुरू झाला होता.
'या' कंपनीने बसवली होती भारतातील पहिली लिफ्ट:
भारतात पहिली लिफ्ट जे. ई. हॉल अँड कंपनी (J. E. Hall & Co.) नावाच्या एका ब्रिटिश कंपनीने बसवली होती. भारतातील पहिली लिफ्ट कोलकात्यातील एका मोठ्या व्यावसायिक इमारतीत बसवण्यात आली होती.
भारतातील लिफ्ट उद्योगाचा विकास:
20व्या शतकात, भारतामध्ये लिफ्ट उद्योगाचा विकास झपाट्याने झाला होता. खालील कंपन्यांनी भारतात लिफ्ट तयार करण्यास आणि बसवण्यास सुरुवात केली होती:
1. ओटिस इंडिया (Otis India) – अमेरिकन ओटिस कंपनीने भारतात लिफ्टचे उत्पादन सुरू केले होते.
2. कोनेक (KONE India) – फिनलंडस्थित कंपनीने भारतात लिफ्ट तंत्रज्ञान विकसित केले होते.
3. शिंडलर इंडिया (Schindler India) – स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध लिफ्ट कंपनी भारतात कार्यरत झाली होती.
4. थायसेनक्रुप (ThyssenKrupp) – जर्मनीमधील लिफ्ट कंपनी भारतात लिफ्ट आणि एस्केलेटर पुरवू लागली.
'ही' आहे भारतातील पहिली स्वदेशी लिफ्ट:
भारताने स्वतःची लिफ्ट उत्पादन कंपन्या उभारण्यास 20व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरुवात केली. इंडियन एलीव्हेटर्स (Indian Elevators) आणि Escon Elevators या भारतीय कंपन्यांनी स्थानिक पातळीवर लिफ्ट उत्पादन सुरू केले होते. त्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास झाला.