81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे ग

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक

Shibu Soren

Shibu Soren Health Update: झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांची प्रकृती चिंताजनक आहे. 81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू - 

शिबू सोरेन यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात गंगाराम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी त्यांचे पुत्र व झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील 24 जून रोजी रुग्णालयात भेट दिली होती. त्यांनी सांगितले की, वडिलांची प्रकृती अस्वस्थ आहे. डॉक्टर त्यांच्यावर आवश्यक त्या सर्व चाचण्या आणि उपचार करत आहेत.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार

झारखंड मुक्ती मोर्चाचे आधारस्तंभ - 

शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य असून गेल्या 38 वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी आदिवासी हक्कासाठी आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी मोठा लढा दिला आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीने राज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा -अनिल अंबानींना ED चे समन्स; रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स कोसळले 

शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांचीही प्रकृती अस्वस्थ

दरम्यान, झारखंडचे शिक्षणमंत्री रामदास सोरेन यांना नुकताच ब्रेन स्ट्रोक आल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीला हलवण्यात आले. सध्या ते देखील उपचाराधीन आहेत.