Ghibli Images आता मोफत तयार करता येणार! CEO Sam Altman यांची मोठी घोषणा; पंतप्रधान मोदींची घिबली इमेज केली शेअर
Ghibli Style Image: ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी घिबली स्टाईल ईमेजसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांचे नवीन GPT-4o इमेज मेकर टूल आता सर्वांसाठी मोफत असेल. हे इमेज जनरेटर गेल्या आठवड्यात लाँच झाले आणि लाँचच्या दुसऱ्या दिवशी ते व्हायरल झाले. विशेष म्हणजे हे टूल विशेषतः घिब्ली-शैलीतील प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, जेणेकरून आता प्रत्येकजण स्टुडिओ घिब्लीच्या लोकप्रिय अॅनिमेशन शैलीमध्ये प्रतिमा तयार करू शकेल.
घिबली इमेज जनरेटर आता सर्वांसाठी मोफत -
पंतप्रधान मोदींचे घिबली शैलीतील फोटो -
दरम्यान, सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घिबली शैलीतील फोटोज शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. MyGov (भारत सरकारचे अधिकृत हँडल) ने पंतप्रधान मोदींचे एआय-जनरेटेड फोटो शेअर केले आहेत, ज्यात पंतप्रधान मोदी विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग होते. ऑल्टमनने हे फोटोज भारतीय ध्वजाच्या इमोजीसह पुन्हा शेअर केले, ज्यामुळे इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ उडाली.
हेही वाचा - Ration Card E-KYC: घरबसल्या रेशन कार्डचे ई-केवायसी कसे करायचे? जाणून घ्या सोपी पद्धत
चॅटजीपीटी वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ -
घिबली इमेज जनरेटर टूल इतके लोकप्रिय झाले की, त्याला मिळत असलेल्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील सूचनांमुळे ओपनएआयच्या सर्व्हरवर ताण आला. यामुळे सॅम ऑल्टमनने एक पोस्ट केली आणि वापरकर्त्यांना थोडे हळू काम करण्यास सांगितले जेणेकरून त्यांच्या टीमलाही थोडा आराम मिळेल. यानंतर, त्यांनी एक्सवर घोषणा केली की चॅटजीपीटी इमेज जनरेटर आता सर्वांसाठी मोफत असेल.