केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया य

EPFO कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑटो-सेटलमेंट मर्यादा वाढली; आता 'इतके' रुपये काढता येणार

EPFO Auto Settlement Limit Increase

EPFO Auto Settlement Limit Increase: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFO ​​ने आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-सेटलमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. यामुळे EPFO ​​सदस्यांना जास्तीत जास्त निधी जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की या मोठ्या सेवा वाढीमुळे लाखो सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. सदस्यांना जलद आर्थिक मदत देण्यासाठी EPFO ​​ने कोविड-19 साथीच्या काळात प्रथमच आगाऊ दाव्यांचे ऑटो-सेटलमेंट सुरू केले होते.

3 दिवसांत निकाली काढण्यात येणार दावा - 

मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षात 89.52 लाखांच्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 2.32 कोटी ऑटो दावे निकाली काढले गेले. मंत्र्यांनी सांगितले की सदस्याने दाखल केलेला आगाऊ दावा दाखल केल्यापासून तीन दिवसांत निकाली काढला जाईल. 

हेही वाचा - आता Amazon घरपोच देणार 'ही' सेवा! वृद्धांना मोठा होणार फायदा

तथापी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांना तृतीय पक्ष एजंट्सची मदत घेण्याविरुद्ध इशारा दिला आहे. महत्त्वाच्या माहिती सार्वजनिक होण्याचा धोका टाळण्यासाठी, त्यांच्या पीएफ खात्यांशी संबंधित सेवांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरण्याचा सल्ला EPFO ने दिला आहे. ईपीएफओचे सात कोटींहून अधिक सदस्य आहेत जे विविध खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे कर्मचारी किंवा माजी कर्मचारी आहेत. 

हेही वाचा - आता आधार असेल तरच बनवता येणार पॅन कार्ड; 'या' तारखेपासून लागू होणार नवीन नियम

अनेक सायबर कॅफे ऑपरेटर / फिनटेक कंपन्या अधिकृतपणे मोफत असलेल्या सेवांसाठी ईपीएफओ सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये हे ऑपरेटर फक्त ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रार प्लॅटफॉर्मचा वापर करतात, जो कोणताही सदस्य स्वतःहून मोफत करू शकतो. त्यामुळे EPFO ने आपल्या सदस्यांना फसवणूक टाळण्याचा आणि मोफत सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.