सर्वसामान्यांसाठी खूशखबर! पेट्रोल, डिझेल आणि गॅस स्वस्त होणार
Petrol-Diesel And Gas Will Be Cheaper: मध्यमवर्गीयांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच काळापासून सर्वसामान्य नागरिक पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी होण्याची वाट पाहत होता. आता या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती कमी होऊ शकतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत तेल उत्पादन वाढवण्याच्या तयारीमुळे इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाई नियंत्रित होण्यास मदत होईल.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, अमेरिकेत, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'ड्रिल, बेबी, ड्रिल', जे अधिक खोदकाम आणि अधिक तेल उत्खननाचे लक्षण आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी करायच्या आहेत. त्यामुळे मला वाटते की जागतिक ऊर्जेची परिस्थिती सुधारेल. बाजारात अधिक तेल आणि वायू येतील आणि यामुळे किमती कमी होण्यास मदत होईल, असंही केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - एकदाच प्रीमियम भरा अन्...आयुष्यभर पेन्शन मिळवा! LIC ने सुरू केली नवीन Smart Pension योजना
दरम्यान, जेव्हा कमी किमतीत पुरेशा प्रमाणात ऊर्जा उपलब्ध असते, तेव्हा महागाई नियंत्रित करण्यास देखील मदत होते. पुरी यांनी सांगितलं की, भारताचे प्राथमिक उद्दिष्ट महागाई नियंत्रित करण्यासाठी 'कमी किमतीत' पुरेसे तेल खरेदी करणे आहे. तेल खरेदीमध्ये डॉलरचा वापर बंद करण्याचा कधीही हेतू नव्हता, असंही पुरी यांनी यावेळी नमूद केलं.
ऊर्जा क्षेत्रात भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील - पेट्रोलियम मंत्री
तथापी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन अमेरिकन प्रशासनाशी भारताचे संबंध प्रस्थापित झाले आहेत, असा विश्वासही यावेळी पुरी यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील.