प्रौढ कंटेंटवर सरकारचा लगाम! उल्लू, ALTT सह 20 अॅप्सवर बंदी
नवी दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) भारतात अश्लील आणि प्रौढ सामग्रीचा प्रसार करणाऱ्या 24 अॅप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ULLU, ALTT, Big Shots, MoodX, Desiflix, Boomex यांसारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. सरकारकडून जारी अधिसूचनेनुसार, या प्लॅटफॉर्म्सवर सॉफ्ट पोर्न आणि अश्लील कंटेंट प्रेक्षकांना दाखवला जात होता. या प्लॅटफॉर्म्सना अनेक भारतीय कायदे आणि डिजिटल नैतिकतेच्या मानकांचे उल्लंघन करणारी सामग्री प्रसारित केली जात होती.
अधिसूचनेनुसार, हे अॅप माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (विशेषतः कलम 67 आणि 67 अ), भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 294 आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, 1986 च्या कलम 4 अंतर्गत तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. या कायद्याअंतर्गत, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील अश्लीलता, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन, आणि माध्यमांतून महिलांचे अश्लील चित्रण यांना बंदी आहे.
हेही वाचा - मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले
बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सची संपूर्ण यादी
- कंगन अॅप
- बुल अॅप
- जलवा अॅप
- वॉ एंटरटेनमेंट
- लूक एंटरटेनमेंट
- हिटप्राइम
- फेनेओ
- शोएक्स
- सोल टॉकीज
- अड्डा टीव्ही
- हॉटएक्स व्हीआयपी
- हलचल अॅप
- मूडएक्स
- निऑनएक्स व्हीआयपी
- फुगी
- मोजफ्लिक्स
- ट्रायफ्लिक्स
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या 112 वैमानिकांनी घेतली होती आजारी रजा
दरम्यान, शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर याबाबत प्रतिक्रिया देत म्हटले की, 'ही खूप चांगली बातमी आहे. आम्ही उल्लू आणि ALTT अॅप्सवर स्थायी समितीत आवाज उठवला होता. सरकारने योग्य निर्णय घेतला.' तथापी, MIB ने देशातील सर्व इंटरनेट सेवा प्रदात्यांना या वेबसाइट्सवर त्वरित प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दूरसंचार विभागाशी समन्वय साधून ही बंदी प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.