पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्

पहलगाम हल्ल्यानंतर सरकार अॅक्सन मोडमध्ये! पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठकीत आखण्यात येत आहे रणनीती

Meeting at PM Modi's residence

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. या बैठकीत अमित शाहा आणि डोभाल दहशतवाद्यांविरोधात रणनीती आखत आहेत. तथापि, आज, राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख (सीडीएस), तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.

हेही वाचा - 'देशात मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत आहे म्हणून...'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त वक्तव्य

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू - 

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पहलगाम आणि संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिली. त्यांनी सांगितले की सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

हेही वाचा - योग्य उत्तर देऊ...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राजनाथ सिंह यांचे महत्त्वपूर्ण विधान

अमित शाहा यांनी केली पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी - 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आज पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी केली. दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बोलताना अमित शहा म्हणाले की, या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू. आज अमित शाहा यांनी सर्व एजन्सींसोबत सुरक्षा आढावा बैठक घेतली.