Mother Dairy Milk Price Cut: GST माफीचा ग्राहकांना थेट फायदा! मदर डेअरीकडून दुग्धजन्य उत्पादनांच्या किमतीत कपात
Mother Dairy Milk Price Cut: जीएसटीमध्ये झालेल्या मोठ्या बदलांचा परिणाम थेट ग्राहकांना मिळू लागला आहे. मदर डेअरीने त्यांच्या UHT मिल्क (टेट्रा पॅक) सहित अनेक दुग्धजन्य आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या या नवीन किंमत यादीनुसार, ग्राहकांना आता दुध, पनीर, बटर, मिल्कशेक आणि तूप यांसारखी उत्पादने स्वस्त दरात मिळणार आहेत.
हेही वाचा - Gold Price Today: सोने-चांदीच्या किमतीत घसरण! काय आहेत आजचे ताजे दर? जाणून घ्या
दुधाच्या नवीन किंमती
UHT टोन्ड दूध (1 लिटर टेट्रा पॅक): 75 रुपये (पूर्वी 77 रुपये) UHT डबल टोन्ड दूध (450 मिली पाउच): 32 रुपये (पूर्वी 33 रुपये) पनीर (200 ग्रॅम): 92 रुपये (पूर्वी 95रुपये), (400 ग्रॅम): 174 (पूर्वी 180 रु) मलई पनीर (200 ग्रॅम): 97 रुपये (पूर्वी 100 रुपये) बटर (500 ग्रॅम): 285 रुपये (पूर्वी 305न), (100 ग्रॅम): 58 रुपये (पूर्वी 62 रुपये) मिल्कशेक (180 मिली): 28 रुपये (पूर्वी 30 रुपये) तूप (1 लिटर कार्टन/पाउच): 645 रुपये (पूर्वी 675 रुपये) गाय तूप (500 मिली): 365 रुपये (पूर्वी 380 रुपये) प्रीमियम गिर गाय तूप (500 मिली): 984 रुपये (पूर्वी 999 रुपये)
पाउच दुधावर मात्र कोणताही बदल होणार नाही, कारण त्यावर आधीपासूनच शून्य टक्के GST लागू आहे. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलीश यांनी सांगितले की, GST मध्ये झालेली कपात ही ग्राहकांसाठी महत्त्वाची सवलत आहे. यामुळे पॅकेज्ड दुग्धजन्य उत्पादनांचा वापर वाढेल आणि सुरक्षित तसेच उच्च-गुणवत्तेची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचतील. दरम्यान, अमूलनेही स्पष्ट केले आहे की पाउच दुधाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही, कारण त्यावर आधीच 0 टक्के GST लागू आहे.