पुढील 3 दिवस देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस! हवामान विभागाकडून अलर्ट जारी
नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागात मान्सून आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल. उत्तर भारत, पूर्वेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील काही भागातही मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील काही भागात लोकाना उष्णता आणि आर्द्रतेचा त्रास सहन करावा लागणार आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज
दरम्यान, 13 जुलै ते 18 जुलै दरम्यान हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण वायव्य भारतात अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 जुलै रोजी दिल्ली आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 ते 16 जुलै दरम्यान राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्व भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
उत्तर प्रदेश-उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा -
उत्तर प्रदेशात 13 ते 17 जुलै दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 जुलै रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा -
तथापी, हवामान खात्याने उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. देहरादून, नैनिताल आणि बागेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर उधम सिंह नगर, चंपावत, टिहरी, पौरी, रुद्रप्रयाग, चमोली आणि पिथोरागडमध्ये विजांच्या कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - दिल्लीत हिट अँड रनची घटना! दारूच्या नशेत ऑडी चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडले
मुंबई ते गुजरात पर्यंत मुसळधार पाऊस -
हवामान विभागाने 13 ते 16 जुलै दरम्यान गुजरात, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः 13 आणि 14 जुलै रोजी गुजरातमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागातही विजांसह पाऊस पडू शकतो. ईशान्य भारतातील सर्व राज्यांमध्ये 18 जुलैपर्यंत सतत पाऊस पडत राहील. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - तामिळनाडूमध्ये डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग; मोठे नुकसान
दक्षिण भारतात हलक्या पावसाचा अंदाज -
याशिवाय, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात 18 जुलैपर्यंत अधूनमधून पाऊस पडेल, परंतु तामिळनाडू आणि आंध्रच्या काही भागात 14 जुलैपर्यंत उष्णता आणि आर्द्रता कायम राहील.