केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरला अपघात; लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड
उत्तराखंड : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे मोठी दुर्घटना टळली आहे. येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लॅडिंग दरम्यान कोसळले. हे हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) येथून केदारनाथला येत होते. हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्या वेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे संतुलन बिघडले.
केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅडजवळ अपघात झाला. घटनेवेळी तेथे तैनात कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी तात्काळ घटनास्थली पोहचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले वैद्यकीय पथक आणि पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या प्रशासनाकडून हेलिकॉप्टर हेलिपॅडवरुन काढून परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Rahu Sankraman 2025: राहूचा शनीच्या कुंभ राशीत प्रवेश; 'या' तीन राशींसाठी चांगले दिवस सुरू
आजकाल मोठ्या संख्येने भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचत आहेत अशा स्थितीत ही दुर्घटना आणखी मोठी होऊ शकली असती. प्रशासनाने हेलिकॉप्टर ऑपरेशन्सचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताचे कारण मानले जात आहे. हवाई वाहतूक नियंत्रण आणि संबंधित संस्थानाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
खरंतर, केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्सचे क्रॅश लँडिंग करावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळले. यामुळे, हेलिपॅडच्या सुमारे 20 मीटर आधी ते उतरवावे लागले. एअर अॅम्ब्युलन्सच्या क्रॅश लँडिंग दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये दोन डॉक्टरांसह एक पायलट असल्याची माहिती आहे. या अपघातात सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.