दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील एका इमारतीवरून उडी

दिल्लीत इमारतीवरून उडी मारून IFS अधिकारी जितेंद्र रावत यांची आत्महत्या; तपासादरम्यान समोर आली धक्कादायक बाब

IFS officer Jitendra Rawat Suicide

IFS officer Jitendra Rawat Suicide: दिल्लीतील चाणक्यपुरी येथील एका आयएफएस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. पोलिस तपासानंतरच आयएफएस अधिकाऱ्याच्या मृत्यूचे कारण कळेल. सध्या पोलिस अधिकारी तपासात व्यस्त आहेत.

हेही वाचा - अकोला : पोलिसाने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने NEET विद्यार्थ्याची आत्महत्या

पोलिसांकडून जितेंद्र रावत यांच्या मृत्यूची पुष्टी - 

दरम्यान, पोलिसांनी जितेंद्र रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नसल्याचे सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताचे नाव जितेंद्र रावत असे असून, त्याचे वय 35 ते 40 वर्षे आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत हे उत्तराखंडचे रहिवासी होते.

हेही वाचा - Man Commits Suicide After Stock Market Loss: शेअर मार्केटने केलं कंगाल! 16 लाखांचे नुकसान झाल्याने नाशिकमधील तरुणाने संपवली जीवनयात्रा

तपासात समोर आली महत्त्वाची माहिती - 

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, जितेंद्र हे नैराश्याने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते चाणक्यपुरी येथील एमईए रेसिडेन्शियल सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, ज्याच्या छतावरून त्यांनी आज सकाळी उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी त्याची आई घरात एकटीच होती. 

जितेंद्र रावत यांची पत्नी आणि दोन मुले डेहराडूनमध्ये राहतात. या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. त्याच वेळी, सकाळी जेव्हा आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा विविध चर्चा सुरू झाल्या. काही लोक या घटनेला कौटुंबिक कलहाशी जोडत आहेत. तथापि, या घटनेमागील सत्य काय आहे, हे तपासानंतर समोर येईल.