JEE Advanced 2025: आयआयटी दिल्ली झोनचा पुन्हा दबदबा! सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड
JEE Advanced 2025: जेईई अॅडव्हान्स्ड 2025 चे आयोजन करणारी संस्था आयआयटी कानपूरने परीक्षा आणि निकालांचा सविस्तर 1281 पानांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की आयआयटी दिल्ली झोनचा निकाल देशभरात सर्वोत्तम ठरला आहे.
या वर्षी एकूण 1,87,223 विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये –
हैदराबाद झोन : 45,622 विद्यार्थी (सर्वाधिक) मुंबई झोन : 37,002 विद्यार्थी दिल्ली झोन : 34,069 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहता – हैदराबाद झोन : 12,946 (28.37%) मुंबई झोन : 11,226 (30.33%) दिल्ली झोन : 11,370 (सर्वोच्च 33.37% स्थानी आहे)
आयआयटी प्रवेशातील निकाल
पात्रतेनंतर आयआयटीमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दिल्ली झोन अव्वल ठरला आहे.
दिल्ली झोन : 4,182 (सर्वोच्च 36.78%) हैदराबाद झोन : 4,363 (33.70%) मुंबई झोन : 3,825 (34.07%)
आयआयटीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कुठल्या झोनमधून?
या वर्षी आयआयटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या एकूण 18,188 विद्यार्थ्यांपैकी –
दिल्ली झोन : 4,812 विद्यार्थी हैदराबाद झोन : 4,363 विद्यार्थी मुंबई झोन : 3,825 विद्यार्थी रुड़की झोन : 1,729 विद्यार्थी कानपूर झोन : 1,622 विद्यार्थी खडगपूर झोन : 1,655 विद्यार्थी गुवाहाटी झोन : 812 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आयआयटी दिल्ली झोनमधून परीक्षा देणारे, पात्र ठरणारे आणि अखेरीस आयआयटीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या झोनमध्ये राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश असल्याने, विशेषतः राजस्थानातील विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाण यशस्वी ठरत असल्याचे दिसते.