Weather Updates : आयएमडीने वर्तवला 'या' ठिकाणी बर्फाचा अंदाज
गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये पाऊस झाल्यामुळे तेथील हवामान 19.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यावर्षी हंगामी नेहमीपेक्षा 4.1 अंश जास्त झाले. त्यासोबत 1951 पासून आतापर्यंतचे सर्वाधिक किमान तापमानदेखील बनले आहे. आएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीमधील भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिवसभर विजांच्या गडगडाटांसह पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. कमाल तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षादेखील भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवले आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आर्द्रतेचे प्रमाण 72% होते. सध्या हवेची गुणवत्ता खूप चिंताजनक असून हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 260 पेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांच्या आकडेवारीनुसार, ते 'खराब' श्रेणीत असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा: CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री.. आयएमडीनुसार (IMD) 'या' राज्यात बर्फाचा इशारा:
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या उत्तरेतील भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, तसेच हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे.
शनिवारपर्यंत हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हलके किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि गडगडणाऱ्या वादळाची शक्यतादेखील आयएमडीने (IMD) शक्यता दिली आहे.
मुंबईतील उष्णतेच्या लाटेत वाढ:
सध्या मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेत वाढ होत असून बुधवारी सांताक्रूझच्या हवामान निरीक्षण शाळेने कमाल तापमान 38.5 अंश सेल्सिअस नोंदवले. जे सामान्यपेक्षा 5.7 अंश जास्त होते. सामान्यांच्या तुलनेत मुंबईतील तापमान 38.7 अंशांवर पोहोचल्यानंतर फेब्रुवारी 2017 नंतरचे हे सर्वाधिक तापमान आहे. आयएमडीने (IMD) मुंबईतील विविध उपनगरीत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज सांगितला आहे.