PM Narendra Modi on Youth : पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना केंद्र सरकार देणार 15,000 रुपये ; जाणून घ्या
79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे. त्यांनी पंतप्रधान विकास भारत योजनेची घोषणा केली आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर सरकार तरुणांना 15,000 रुपये देईल.
त्याचप्रमाणे आता नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या संदर्भात सांगितले की, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या केंद्र सरकार तरुणांना 15,000 रुपयांची आर्थिक मदत देईल. फ्रेशर्सना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी 3,000 रुपयांपर्यंत देईल. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाईल.
पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. फ्रेशर्सना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून प्रति कर्मचारी 3,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळेल.यासाठी 99,446 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत 2 वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश - रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे. - विशेषतः उत्पादन क्षेत्रात 18-35 वयोगटातील तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. - एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना पाठिंबा देणे. - मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे - उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये समाविष्ट करणे. सामाजिक सुरक्षा सेवांचा विस्तार करणे (पेन्शन, विमा).