नवी दिल्लीतील बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाड

Rahul Gandhi: संसद भवन ते निवडणूक आयोग विरोधकांनी रोखला मोर्चा; राहुल-प्रियंका यांसह अनेक नेते ताब्यात

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आज सकाळपासून राजकीय वातावरण तापले आहे. मतदार यादीतील कथित बोगस मतदार प्रकरणावरून ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून हा मोर्चा थांबवला आणि त्यानंतर संसद परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. आघाडीतील जवळपास २५ पक्षांचे सुमारे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश होता.मोर्चाला अटकाव झाल्यानंतर खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून सर्वांना रोखले होते. काही खासदारांनी हे अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तर बॅरिकेट्स चढून जाण्याचा प्रयत्न करताच परिसरात तणाव निर्माण झाला. हेही वाचा:Jitendra Awhad Meat Controversy: 'बापाचं राज्य आहे का?'; स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीवर जितेंद्र आव्हाडांचा संताप दरम्यान, आंदोलनादरम्यान काही ज्येष्ठ आणि महिला खासदारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी तातडीने वैद्यकीय पथके बोलावण्यात आली. दिल्ली पोलिसांकडून दंगल नियंत्रक पथकांसह मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.या साऱ्या आंदोलनाची पार्श्वभूमी राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा पुराव्यांसह केलेला आरोप आहे. विरोधकांचा आरोप आहे की, भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली. या मुद्द्यावरून ‘इंडिया’ आघाडीने थेट निवडणूक आयोगावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा: Rajnath Singh: भारताच्या प्रगतीवर बाहेरच्यांचा डोळा; संरक्षणमंत्र्यांची ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष टीका पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर विरोधकांनी संसद परिसरातच आक्रमक पवित्रा घेतला. ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी आणि पोलिसांशी चकमकीमुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले. संपूर्ण परिसरात सुरक्षेचे काटेकोर बंदोबस्त असून, ताब्यात घेतलेल्या खासदारांना जवळच्या पोलिस ठाण्यांत हलवण्यात आले आहे.

या घडामोडींनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला असून, पुढील काही दिवसांत हा मुद्दा संसदेत आणि देशभरातील आंदोलनांतून गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.