भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणाव व

बापरे! पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वतःच कबुल केली 'ही' धक्कादायक गोष्ट; नेमकं काय म्हणाले?

India-Pakistan tensions peak again: भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे. भारताने 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील रावळपिंडी विमानतळासह महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ला केला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याची कल्पनाही पाकिस्तानी लष्कराला नव्हती, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे पाक लष्कराच्या तयारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

शरीफ अझरबैजानमध्ये आयोजित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारतावर 10 मे रोजी सकाळच्या नमाजानंतर हल्ला करण्याची योजना आखली होती. ही योजना लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली होती. मात्र, भारताने वेळ न दवडता रात्रीच आपल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये स्थित लष्करी तळांवर अचूक हल्ला केला. त्यामध्ये रावळपिंडीमधील विमानतळही होते. हेही वाचा: हगवणे कुटुंबाविरोधातील आरोपांची मालिका कधी संपणार? आणखी एक नवा गुन्हा दाखल, जाणून घ्या...

शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट लष्करी कारवाई करत पाकिस्तानच्या सुरक्षाव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली, असा अर्थ या कबुलीतून निघतो. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या रडार प्रणालीला आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेला भारताच्या या कारवाईचा थांगपत्ता लागलाच नाही.

ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारताची अभिमानास्पद रक्षा प्रणाली मानले जाते. हे क्षेपणास्त्र अतिशय वेगवान, अचूक आणि लांब पल्ल्याचे असून, त्याचा वापर युद्धनौकांपासून जमिनीवरील लक्ष्यांपर्यंत कुठेही करता येतो. भारताने वेळेवर आणि तितक्याच ठामपणे हे शस्त्र वापरत पाकिस्तानला धडा शिकवल्याचे स्पष्ट दिसते.

या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता असून, जागतिक समुदाय या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे, शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या लष्करावर आणि सुरक्षा यंत्रणेवर देशांतर्गत टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या रणनीतीतून पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली सशक्त सैनिकी क्षमता दाखवून दिली आहे.