सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने कोणतीही

भारताने अचानक सोडले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानात पूरसदृश परिस्थिती

Flood-like situation in Pakistan प्रतिकात्मक प्रतिमा

इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्व बाजूंनी कारवाई सुरू केली आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने कोणतीही माहिती न देता चिनाबचे पाणी सोडले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आता दहशतवादाविरुद्ध पूर्णपणे सज्ज झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताने सर्व प्रकारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू करार स्थगित केला. यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचे संकट निर्माण झाले. 

पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती - 

दरम्यान, आता भारताने अचानक चिनाब नदीचे पाणी सोडले आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पाकिस्तानमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरं तर, सिंधू पाणी करारामुळे, भारत पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला इशारा देत असे. परंतु करार रद्द झाल्यानंतर, इशारा न देता पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताची कारवाई -  

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतात बैठकांची मालिका सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी लष्कराला कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली असून भारताने पाकिस्तानवर आपली पकड घट्ट केली आहे. यामुळे आता पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.

हेही वाचा - मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन

पाकिस्तानमध्ये पुराचा धोका वाढला

भारताने अचानक पाणी सोडल्याने सध्या पाकिस्तानमध्ये पुराचा धोका वाढला आहे. पावसानंतर जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीची पाण्याची पातळी सामान्यपेक्षा 5 ते 7 फूट जास्त आहे. यामुळे पीओकेच्या सखल भागात पुराचा धोका आहे. सुरखपूर, उरी, हेडमराला, मदिखोखराम, बहलोलपूर, गंगवालमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच झेलम नदीची पातळी एका रात्रीत 8 ते 10 फूट वाढली. भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने पाकिस्तानची आता चांगलीचं तारांबळ उडाली आहे. 

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोकणात समुद्रकिनाऱ्यांची काटेकोर तयारी

पीओकेमध्ये पूरसदृश परिस्थिती - 

दरम्यान, दहशतवादाचा गड मानला जाणारा पीओके आता पूरसदृश परिस्थितीचा सामना करत आहे. भारताने पाणी थांबवण्याची केलेली कृती पाकिस्तानने युद्धासारखी असल्याचं म्हटलं होतं. तथापि, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील लोक उपासमारीने आणि पाण्याविना मरू शकतात, असं म्हटलं होतं.