IRCTC New Rule : सणावारासाठी तिकीट बूक करण्याआधी रेल्वेचा 'हा' नवा नियम एकदा वाचा
मुंबई: सणासुदीच्या काळात लांबची यात्रा करण्यासाठी बहुतांश सर्वसामान्य प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यासाठी अनेकजण एडवांसमध्ये टिकिट काढतात. अशातच, सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून भारतीय रेल्वे ऑनलाईन टिकिट बुकिंग पद्धतीमध्ये मोठा बदल करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली आहे की, 'तात्काळ टिकिटांप्रमाणेच सामान्य आरक्षण टिकिटांची बुकिंग करताना ऑनलाईन आधार वेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे'.
पुढे, रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली की, 'सामान्य वापरकर्त्यांना रेल्वेच्या टिकीटांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, आयआरसीटीसी वेबसाइट आणि ॲपच्या मदतीने ऑनलाईन सर्वसाधारण आरक्षित तिकीटे बुक केल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये आधार ओळख पडताळणी आवश्यक करण्यात आले आहे. हा नियम लागू करण्यामागील मुख्य कारण म्हणजे खोटारड्या लोकांकडून होणाऱ्या गैरवापराला रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे', अशी माहिती सरकारने दिली आहे. तसेच, भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काउंटरवर सामान्य आरक्षण तिकिटांच्या बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
सणासुदी आणि लग्न सराईच्या काळातील प्रभाव
गणपती, नवरात्री, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदींसोबतच लग्नाच्या काळात टिकिटांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेषत: जेव्हा ठरलेल्या यात्रेच्या तारखेच्या 60 दिवसांपूर्वीच टिकिट घर सुरू होते. त्यामुळे, सामान्य बुकिंगद्वारे तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होते, जसे की तत्काळ बुकिंग दरम्यान दिसणारी गर्दी. त्यामुळे, या व्यस्त काळात नवीन आधार - आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि फसव्या बुकिंग कमी होतील अशी अपेक्षा आहे.
रेल्वेचा 'हा' नवा नियम अशाप्रकारे काम करेल
उदाहरणासाठी, जर एखादा प्रवासी 17 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते राजर्षी शाहू महाराज रेल्वे टर्मिनस कोल्हापुरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये टिकिट बुक करायचं असेल, तर बुकिंग काउंटर 18 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता सुरू होईल. रात्री 12:20 ते 12:35 वाजल्याच्या सुमारास फक्त आधार प्रमाणीकरण न करता या 15 मिनिटांदरम्यान, जेव्हा टिकिटांची मागणी सर्वाधिक असते, तेव्हा कोणीही बुकिंग नाही करू शकणार.
तात्काळ बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आधीपासून गरजेचे
हे पहिल्यांदा नाही आहे, जेव्हा आधार प्रमाणीकरणाला रेल्वे टिकिट बुकिंगशी जोडण्यात आले आहे. जुलै 2025 मध्ये, भारतीय रेल्वेने ऑनलाईन तात्काळ टिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांसाठी आधार प्रमाणीकरण आयआरसीटीसी अकाउंट आवश्यक केले होते. विना आधार प्रमाणीकरणाचे वापरकर्ते आयआरसीटीसी वेबसाईट आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून तात्काळ टिकिट बुक करण्यापासून रोखण्यात आले होते.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
रेल्वे प्रवाशांसाठी सल्ला देण्यात आला आहे की, रेल्वे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी 1 ऑक्टोबरपूर्वीच आपल्या आधार क्रमांकाला आपल्या आयआरसीटीसी खात्यांसोबत लिंक करून घ्यावे. तसेच, सामान्य आरक्षण टिकिट खिडकी दररोज पहाटे 12:20 वाजल्यापासून ते रात्री 11:45 वाजेपर्यंत सुरू राहते आणि प्रवास तुमच्या निश्चित तारखेच्या 60 दिवसांपूर्वीच बुकिंग सुरू होते. नवीन नियम टिकिट खिडकीच्या सुरूवातीच्या 15 मिनिटांवर लागू होणार, जेव्हा टिकिटांची मागणी सर्वाधिक असते. या बदलांसोबतच, रेल्वेचे लक्ष्य संपूर्ण भारतातील लाखों प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि निष्पक्षपाती टिकिटांची पद्धत सुनिर्धारित करणे आहे.