इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; 40 मिनिटे हवेतचं घिरट्या घालत राहिले
तिरुपती: रविवारी संध्याकाळी तिरुपतीहून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगो एअरबस A321neo विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. यामुळे 40 मिनिटांहून अधिक काळ विमान आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतर या विमानाचे तिरुपती विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राप्त माहितीनुसार, इंडिगोच्या फ्लाइटने संध्याकाळी 7:42 वाजता तिरुपतीहून उड्डाण केले, परंतु काही वेळातच तांत्रिक अडचणीमुळे ते वेंकटनगरीच्या सीमेवर यू-टर्न घेऊन परत आले. रात्री 8:34 वाजता विमानाने तिरुपती विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.
प्रवाशांमध्ये गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण -
या घटनादरम्यान, विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. मात्र, विमान सुरक्षित उतरण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, सुमारे 40 मिनिटे आकाशात प्रदक्षिणा घालल्यानंतर, विमान वेंकटनगरीच्या सीमेवर पोहोचले. त्यानंतर विमानाने यू-टर्न घेतला. अखेर, विमानाने रात्री 8:34 वाजता तिरुपती विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये संताप
या घटनेनंतर तिरुपतीहून हैदराबादला जाणारी शेवटची फ्लाइट रद्द करण्यात आली, ज्यामुळे अनेक प्रवासी निराश झाले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये प्रवासी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी विमानतळावर संतप्तपणे बोलताना दिसत आहेत.
हेही वाचा - हवेत विमानाच्या इंजिनला लागली आग! पायलटने वाचवला 294 प्रवाशांचा जीव
घटनेनंतर अद्यापपर्यंत इंडिगोने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तथापी, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात संतप्त प्रवासी विमानतळावर इंडिगो कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीही नवी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे रात्रीच्या वेळी मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.