INS विक्रांतने मोडले पाकिस्तानचे कंबरडे! कराचीसह अनेक शहरांमध्ये हल्ले
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर, पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू आणि काश्मीरसह अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैन्याने ते सर्व हाणून पाडले. यानंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने एकामागून एक पाकिस्तानवर हल्ला करायला सुरुवात केली. दरम्यान, आयएनएस विक्रांतने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे.
कराची बंदर उद्ध्वस्त -
भारतीय नौदलाच्या लढाऊ विमानांनी कराची बंदराचे मोठे नुकसान केले आहे. याशिवाय, भारतीय नौदलाने जखौ आणि ओखा दरम्यानच्या आयएमबीएलमधून पाकिस्तानच्या अनेक भागात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नौदलाच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाने आणखी एक पाकिस्तानी विमान पाडले
भारतीय नौदलाने ठेचल्या पाकिस्तानच्या नांग्या-
दरम्यान, भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतवरून उड्डाण करणाऱ्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी नौदलाच्या दोन बॉम्बर विमानांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हे तळ कराची आणि ओरमारा बंदरांवर आहेत. या दोन्ही ठिकाणी आयएमबीएल क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे.
हेही वाचा - भारतीय लष्कराने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने JF-17 पाडली; अनेक क्षेपणास्त्रेही केली नष्ट
कराची आणि ओरमारा बंदरे पूर्णपणे उद्ध्वस्त -
भारतीय नौदलाच्या हल्ल्यात कराची आणि ओरमारा बंदरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतवरून उडवलेल्या दोन्ही लढाऊ विमानांनी बंदराचा प्रत्येक भाग उद्ध्वस्त केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांची कार्यालयेही उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.