Kavach 5.0 लाँचसाठी सज्ज! आता मेट्रो-लोकल ट्रेनने प्रवास करणं होणार अधिक सुरक्षित
नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही 'कवच' तंत्रज्ञानाबद्दल ऐकले असेलच, आता त्याचे नवीन आणि चांगले व्हर्जन कवच 5.0 येत आहे. डिसेंबर 2025 पर्यंत मेट्रो आणि लोकल ट्रेनमध्ये कवच 5.0 लागू करण्याची CAR ची योजना आहे. याचा अर्थ असा की मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकल ट्रेनपासून मेट्रोपर्यंत प्रवास करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.
'कवच 5.0' काय आहे?
'कवच' हे एक स्वदेशी तंत्रज्ञान आहे, जे रेल्वेनेच विकसित केले आहे. ही एक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम (ATP) आहे, जी ट्रेन चालकाला वेग मर्यादेत गाडी चालवण्यास मदत करते. जर चालकाने चूक केली तर तो आपोआप ब्रेक लावतो आणि ट्रेन थांबवतो जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. आता येणारे 'कवच 5.0' हे अधिक प्रगत असेल. हे ट्रेनच्या टक्कर रोखण्यासाठी आणखी चांगले काम करेल. यामुळे लोकल ट्रेनची क्षमता दीड पटीने वाढेल, म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी प्रवास करणे थोडे अधिक आरामदायी होऊ शकेल.
हेही वाचा - Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये भाजपची अण्णाद्रमुक सोबत युतीची घोषणा!
'कवच' खराब हवामानातही सुरक्षित -
तथापी, 'कवच'चे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते खराब हवामानातही ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यास मदत करते. धुक्यात किंवा पावसात, ड्रायव्हरने कोणतीही चूक करण्यापूर्वीच सिस्टम सक्रिय होते.
कवचमुळे काय फायदा होईल?
कवच तंत्रज्ञानामुळे मेट्रो आणि लोकल ट्रेनमधील अपघात आणखी कमी होतील. प्रवाशांना सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाचा अनुभव मिळेल.
कवच 5.0 मुळे भारतीय रेल्वेला मिळणार नवी दिशा -
'कवच 5.0' हे केवळ एक तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेला एक नवीन दिशा मिळणार आहे. येणाऱ्या काळात, जेव्हा तुम्ही मेट्रो किंवा लोकल ट्रेनमधून प्रवास कराल तेव्हा त्याच्या मागे एका हाय-टेक शील्डची शक्ती असेल, जी तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेईल.