पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 70 ते 80 ज

Kishtwar Cloud Burst : CISF जवानांसह 46 जणांचा मृत्यू , शेकडो जखमी तर 70 बेपत्ता, जम्मू काश्मीरमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती

kishtwar cloud burst

गुरुवारी दुपारी 12.30 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये अचानक ढगफुटी झाली. माचैल माता मंदिराच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर ही पत्ती घडली, ज्यामध्ये दोन सीआयएसएफ जवानांसह 45 जणांचा मृत्यू झाला. 70  हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या घटनेनंतर अचानक पूर आला आणि मोठ्या प्रमाणात विनाश झाला. 100 हून अधिक लोक जखमी आहेत, त्यापैकी 37 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 70 ते 80 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

200 जण अजूनही बेपत्ता

माचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या चाशोटी गावात ही दुर्घटना घडली. अपघात झाला तेव्हा माचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. 9500 फूट उंचीवर असलेल्या माचैल माता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविक फक्त मोटार वाहनानेच चाशोटी गावात पोहोचू शकतात. त्यानंतर त्यांना 8.5 किमी पायी प्रवास करावा लागतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की 38 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत 100 जणांना वाचवण्यात आले आहे. सुमारे 200 जण अजूनही बेपत्ता आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले 

त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ढगफुटीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीमुळे बाधित झालेल्या सर्व लोकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे."