बेंगळुरूमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला 10 हजार रुपयां

10 हजार रुपयांच्या पैजेपायी गेला जीव! पाणी न मिसळता 5 बाटल्या दारू प्यायल्याने तरुणाचा मृत्यू

man dies due to drink 5 bottles liquor

बेंगळुरू: कर्नाटकमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बेंगळुरूमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला 10 हजार रुपयांच्या पैजासाठी आपला जीव गमवावा लागला. एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, मृत कार्तिकने त्याच्या मित्रांना दावा केला होता की, तो पाणी न मिसळवता पाच बाटल्या दारू पिऊ शकतो. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की, जर त्याने हे केले तर ते त्याला 10 रुपये देतील. 

अटीनुसार, कार्तिकने पाणी न मिसळता पाच बाटल्या दारू प्यायली आणि पैज जिंकली. परंतु दारू प्यायल्यानंतर लगेचच त्याची तब्येत बिघडू लागली. कार्तिकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही. प्राप्त माहितीनुसार, एक वर्षापूर्वी कार्तिकचे लग्न झाले होते. तसेच तो केवळ आठ दिवसांपूर्वी वडील झाला होता.

हेही वाचा - रॉबर्ट वाड्रा यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील वादग्रस्त टिप्पणी भोवली; उच्च न्यायालयात होणार सुनावणी

10 हजार रुपयांसाठी गमावला जीव - 

10 हजार रुपयांसाठी पाणी न मिसळता दारू प्यायल्याने कार्तिकची प्रकृती बिघडली. त्याला कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात पोहोचला! काय आहेत याचिकाकर्त्यांच्या मागण्या?

मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल  - 

याप्रकरणी व्यंकट रेड्डी आणि सुब्रमण्य यांच्यासह सहा जणांविरुद्ध नांगली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी अंदाजे 2.6 दशलक्ष लोक मद्यपानामुळे मरतात, जे जागतिक मृत्यूंपैकी 4.7 टक्के आहे.