शुक्रवारी कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमें

15 हजार पगार असलेला माजी क्लार्क 24 घरांचा मालक, 30 कोटींची मालमत्ता

बंगळुरू: शुक्रवारी कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KRIDL) मधील एका माजी लिपिकाच्या निवासस्थानी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या दरम्यान, त्यांच्याकडून 30 कोटींहून अधिक संपत्तीची मालमत्ता आढळली. विशेष बाब म्हणजे, त्यांच्याकडे 24 घरे, 4 भूखंड आणि 40 एकरची शेती होती. या घटनेमुळे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा: Pune Accident : खड्ड्यामुळे मोठा अनर्थ, दुचाकी घसरली; ज्येष्ठ नागरिकाला कारने चिरडलं

नेमकं प्रकरण काय?

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KRIDL) मधील कलाकप्पा निदागुंडी यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या छापेमारीदरम्यान, लोकायुक्त अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, कर्नाटकातील कोप्पलमध्ये काम करणारा आणि 15,000 रुपये पगार असलेल्या कलाकप्पा निदागुंडी यांच्याकडे 24 घरे, 4 भूखंड आणि 40 एकरची शेती होती.

jai maharashtra news

यासह, छापेमारी दरम्यान लोकायुक्त अधिकाऱ्यांना कलाकप्पा निदागुंडी यांच्याकडून 4 वाहने, 350 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो चांदी जप्त केली. विशेष म्हणजे, ही मालमत्ता कलाकप्पा, त्यांच्या पत्नीच्या आणि तिच्या भावाच्या नावावर होती. 

jai maharashtra news