सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती संदर्भातील प्रकरणाव

CJI Gavai On Nepal Protests: 'शेजारील देशांकडे बघा...'; नेपाळचा उल्लेख करत सरन्यायाधीश गवई यांनी 'अशी' टिप्पणी का केली?

CJI Gavai On Nepal Protests: सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतींच्या संदर्भावरील सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी शेजारील देशांचा उल्लेख करत भारतीय संविधानाचे कौतुक केले. त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे. आपल्या शेजारील देशांमध्ये काय घडत आहे ते पहा. नेपाळमध्ये काय घडले ते आपण पाहिले आहे.' तथापी, न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनीही या मताशी सहमती दर्शवली आणि म्हटले की बांगलादेशमध्येही अशीच परिस्थिती दिसत आहे.

हेही वाचा - Kim Jong Un Successor : किम जोंग उनची उत्तराधिकारी त्याची मुलगी? 12 वर्षांच्या मुलीच्या हातात उत्तर कोरियाची सूत्रे जाऊ शकतात?

सध्या सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विधेयकांना मान्यता देण्याच्या अधिकाराशी संबंधित 14 प्रश्नांवर पाच न्यायाधीशांचे संविधान खंडपीठ सुनावणी करत आहे. यावेळी सीजेआय गवई यांनी शेजारील देशांमधील अस्थिरतेचा उल्लेख करून भारतीय लोकशाही आणि संविधानाची ताकद अधोरेखित केली.

हेही वाचा - France Violence: नेपाळनंतर फ्रान्सच्या रस्त्यांवर उफाळला हिंसाचार! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात केली निदर्शने

दरम्यान, नेपाळमध्ये सुरू असलेल्या जनरेशन-झेडच्या नेतृत्वाखालील निदर्शनांनी तीव्र हिंसाचाराचे रूप घेतले आहे. सरकारी बंदींविरोधात सुरू झालेल्या या चळवळीचे रुपांतर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात झाले आहे. नेपाळमध्ये तुरुंग फोड, सरकारी व खासगी इमारतींना आग, आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली तसेच राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या राजीनाम्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

नेपाळमध्ये सुरुवातीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारने बंदी घातल्यामुळे निदर्शने सुरू झाली परंतु नंतर त्यांचे रूपांतर भ्रष्टाचारविरोधी चळवळीत झाले. संतप्त निदर्शक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अनेक सरकारी आणि खाजगी इमारती जाळल्या. अनेक नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची घरे आणि कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. देशव्यापी अशांततेदरम्यान लष्कराने नियंत्रण मिळवले निदर्शकांनी शांततेसाठी वारंवार केलेल्या आवाहनांकडे दुर्लक्ष केल्यानंतर मंगळवारी लष्कराने संघर्षग्रस्त देशाचा ताबा घेतला. सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी, लष्कराने देशभरात कडक निर्बंध लादले आहेत.