LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढणार! एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला
LPG Cylinder Price Hike: आता महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसणार आहेत. एलपीजीच्या किमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एलपीजीच्या किमतीत वाढ उज्ज्वला आणि सामान्य ग्राहकांसाठी असेल. म्हणजेच आता तुम्हाला गॅस सिलेंडरसाठी 803 रुपयांऐवजी 853 रुपये द्यावे लागतील. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडर मिळविण्यासाठी 550 रुपये द्यावे लागतील.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, 'एलपीजीच्या किमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ होईल. तुम्ही पाहिलेली उत्पादन शुल्कातील वाढ पेट्रोल आणि डिझेलवरील ग्राहकांवर लादली जाणार नाही. तेल विपणन कंपन्यांना गॅस क्षेत्रात झालेल्या 43 हजार कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा उद्देश आहे.
हेही वाचा -Excise Duty on Petrol-Diesel: पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
अलिकडेच तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमती कमी केल्या होत्या. देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. यानंतर, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1762 रुपये झाली. नवीन किमती 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आल्या.
यापूर्वी, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1803 रुपये होती. मात्र, यावेळी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर भार वाढणार आहे.