LPG Gas Cylinder: जीएसटी दर कमी झाल्याने गृहपयोगी वस्तूंच्या किमतीत घट,मात्र एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होणार का?
LPG Gas Cylinder: सरकारने नुकतेच जीएसटी दर कमी केले आहेत. त्यामुळे देशभरात नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होत आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत सर्व काही स्वस्त होणार आहे. मोठ्या एफएमसीजी कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांसाठी नवीन किंमत यादी जाहीर केली आहे.
शाम्पू, साबण, टूथपेस्ट, बेबी प्रोडक्ट्स, कॉफी आणि हेल्थ ड्रिंक्स यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू आता स्वस्त दरात उपलब्ध आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीबाबतही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. जीएसटी कपातीनंतर एलपीजी सिलेंडरही स्वस्त होतील का?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, सरकारने अद्याप या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
वेगवेगळ्या शहरांमध्ये एलपीजीची किंमत
शहर | सिलेंंडर किंमत |
दिल्ली | 853 रुपये |
मुंबई | 852.50 रुपये |
कोलकत्ता | 879 रुपये |
चैन्नई | 868.50 रुपये |
बंगळुरु | 855.50 रुपये |
हैदराबाद | 905 रुपये |
पटना | 942.50 रुपये |
हेही वाचा: Online Games New Rules : सरकारची मोठी कारवाई; 1 ऑक्टोबरपासून पैशांच्या ऑनलाइन गेम्सवर गंडांतर पी अँड जी (P&G) शॅम्पू आणि डायपरच्या किमती झाल्या कमी प्रॉक्टर अँड गॅम्बलने (पी अँड जी) विक्स, हेड अँड शोल्डर्स, पॅन्टीन, पॅम्पर्स, जिलेट आणि ओरल-बी सारख्या ब्रँडची उत्पादने स्वस्त केली आहेत. हेड अँड शोल्डर्स शाम्पू (300 मिली) आता 360 रुपयांऐवजी 320 रुपयांना उपलब्ध असेल. पॅन्टीन शाम्पूची (340 मिली) किंमत 410 रुपयांवरून 355 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पॅम्पर्स डायपर आणि बेबी वाइप्स देखील आता कमी किमतीत उपलब्ध असतील. जिलेट शेव्हिंग क्रीम 45 रुपयांवरून 40 रुपये आणि ओरल-बी टूथब्रश 35 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आली आहे.
इमामीच्या किमतीही घट
इमामीने बोरोप्लस, नवरत्न तेल, झंडू बाम आणि डर्मिकूल यासारख्या लोकप्रिय उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. बोरोप्लस अँटीसेप्टिक क्रीम (80 मिली) आता 165 रुपयांऐवजी 155 रुपयांना उपलब्ध होईल. नवरत्न तेल (180 मिली) 155 रुपयांवरून 145 रुपयांपर्यंत कमी झाले. झंडू बामची (25 मिली) किंमत125 रुपयांवरून 118 रुपये करण्यात आली आहे. एचयूएलचे डव्ह, लक्स आणि हॉर्लिक्सही स्वस्त झाले आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हरने (HUL) देखील 22 सप्टेंबरपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. डव्ह शाम्पू (340 मिली) आता 490 रुपयांऐवजी 435 रुपयांना मिळेल. लाईफबॉय साबणाची (75 ग्रॅम × 4 पॅक) किंमत 68 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आली आहे. लक्स साबण (75 ग्रॅम × ४4 पॅक) आता 96 रुपयांऐवजी 85 रुपयांना उपलब्ध असेल. हॉर्लिक्स चॉकलेट (200 ग्रॅम) 130 रुपयांवरून 110 रुपये करण्यात आले आहे आणि बूस्ट (200 ग्रॅम) देखील आता 124 रुपयांऐवजी 110 रुपये करण्यात आले आहे. ब्रू कॉफीची (75 ग्रॅम) किंमत 300 रुपयांवरून 270 रुपये करण्यात आली आहे.
जनतेला दिलासा मिळणार सरकारच्या या उपक्रमामुळे कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती सातत्याने कमी करत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन खरेदीमध्ये दिलासा मिळणार आहे.