लोहखनिज वाहून नेणारी मालगाडी छत्तीसगडमधील किरंडुल

मोठा अपघात टळला! आंध्र प्रदेशात मालगाडीचे 25 डबे रुळावरून घसरले

Goods train derailed In Andhra Pradesh

अमरावती: आंध्र प्रदेशातील चिमिडीपल्ली रेल्वे स्थानकाजवळ आज एका मालगाडीचे 25 डबे रुळावरून घसरले. दुपारी लोहखनिज वाहून नेणारी मालगाडी छत्तीसगडमधील किरंडुल येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जात असताना ही घटना घडली. या अपघातामुळे विशाखापट्टणम-किरंडुल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा - माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांचे निधन

मालगाडीचे 25 डबे रुळावरून घसरले - 

पूर्व तटीय रेल्वेने (ECoR) एका निवेदनात म्हटले आहे की, आज दुपारी 1 वाजता वॉल्टेअर विभागांतर्गत अराकू-कोट्टावलसा विभागातील चिमिडीपल्ली रेल्वे स्थानकाजवळ एकूण 50 मालगाडींपैकी किमान 25 डबे रुळावरून घसरले. दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू करता यावे यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी तातडीने मदत गाडी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांवरील MSP वाढवली

प्रवासी रेल्वे सेवा प्रभावित - 

दरम्यान, रेल्वेने सांगितले की विशाखापट्टणम आणि किरंडुल दरम्यानच्या काही प्रवासी गाड्या आंध्रमधील विजयनगरम आणि ओडिशातील रायगड मार्गे पाठवण्यात आल्या आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुरुस्तीच्या कामासाठी एक मदत ट्रेन घटनास्थळी पाठवण्यात आली आहे आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारीही कामावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे उपस्थित आहेत. अपघातानंतर, विशाखापट्टणम आणि किरंदुल दरम्यानच्या काही प्रवासी गाड्या विजयनगरम आणि रायगड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.