या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा ल

Hyderabad Building Collapses: हैदराबादमध्ये मोठा अपघात! निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने 3 कामगारांचा मृत्यू

निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने 3 कामगारांचा मृत्यू!

Hyderabad Building Collapses: हैदराबादमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेत एक कामगारही जखमी झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या व्यावसायिक इमारतीच्या तळघरात कामगार खोदकाम करत असताना हा अपघात झाला. प्राथमिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी सांगितले की, भिंतीचा एक भाग त्यांच्यावर पडला. कोसळलेल्या भीतींच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले.

या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यासंदर्भात हैदराबादमधील एलबी नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, तळघरात खोदकाम करण्यासाठी याठिकाणी सुमारे 10 कामगार काम करत होते. 

हेही वाचा - Indore School Bomb Threats: इंदूरमधील 2 मोठ्या शाळांना बॉम्बच्या धमक्या, शोध मोहीम सुरू

प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळी हॉटेलच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्याच क्षणी भिंत कोसळली आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आपत्ती प्रतिसाद दलाचे (डीआरएफ) जवान घटनास्थळी पोहोचले. डीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून कामगारांना बाहेर काढले. प्राथमिक तपासात मृत कामगार खम्म जिल्ह्यातील सीतारामपुरम थांडा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - दहावी-बारावी परीक्षा ‘ड्रोन’च्या नजरकैदेत! कॉपीप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा

हैदराबादमध्ये इमारतीचा भाग झुकला - 

काही महिन्यांपूर्वी, हैदराबादच्या एका अतिशय आलिशान भागात अचानक एक इमारत हादरू लागली. यानंतर इमारत एका बाजूला झुकली. हे पाहून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. तपासानंतर, पोलिसांनी शेजारच्या इमारतीच्या मालकाविरुद्ध बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.