Indians in Russian Army : 'नोकरीची हाव महागात पडू शकते..' रशियन सैन्यात भारतीयांची भरती; परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधानतेचा इशारा
Indians in Russian Army : रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, दोन भारतीय तरुणांनी दावा केला आहे की, त्यांना फसवून रशियन सैन्यात भरती करून युद्धभूमीवर पाठवण्यात आले आहे. या तरुणांचे म्हणणे आहे की त्यांच्यासोबत किमान 13 भारतीय अडकले आहेत. ही बातमी एका भारतीय वृत्तसंस्थेने पुढे आणली होती. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की ते या प्रकरणाची माहिती गोळा करत आहेत आणि या विषयावर रशियाच्या संपर्कात आहेत.
ही बातमी आल्यानंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील एक निवेदन जारी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत रशियन सैन्यात सामील होण्याची ऑफर स्वीकारू नये, असा इशारा देण्यात आला आहे. मंत्रालयाने रशियन सैन्यात भारतीयांच्या भरतीबाबत एक नवीन निवेदन जारी केले आहे. भारत सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे भारतीयांना नोकरीचे खोटे आश्वासन देऊन रशियन सैन्यात भरती केले जात असल्याची बाब समोर आली आहे. अशी कोणतीही संशयास्पद ऑफर स्वीकारू नका, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा भारतीय नागरिकांना दिला आहे. अलीकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे भारतीयांना नोकरीचे खोटे आश्वासन देऊन रशियन सैन्यात भरती करण्यात आले आहे. अशा ऑफर्सबाबत सावध रहावे आणि संशयास्पद ऑफर्स स्वीकारू नये, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
रशियातील भारतीय तरुणांना खोट्या आश्वासनांद्वारे युद्धभूमीत ढकलले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या दलदलीत अजूनही अनेक भारतीय अडकले आहेत आणि ते घरी परतण्याची विनंती करत आहेत. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एक इशारा जारी केला आहे आणि लोकांना कोणत्याही संशयास्पद ऑफरपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दिल्ली आणि मॉस्कोमध्ये रशियासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. भारताने रशियन अधिकाऱ्यांना ही पद्धत त्वरित थांबवण्याची आणि सापळ्यात अडकवून भरती करण्यात आलेल्या भारतीयांना सोडण्याची जोरदार विनंती केली आहे.
मोदी-पुतिन बैठकीतही यावर चर्चा झाली आहे माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीत बनावट भरतीचा मुद्दा आधीच उपस्थित करण्यात आला आहे. भारत सरकार या विषयावर रशियावर सतत दबाव आणत आहे. जेणेकरून, कोणत्याही भारतीयाला युद्धासारख्या धोकादायक परिस्थितीत ढकलले जाऊ नये किंवा फसवले जाऊ नये.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकार या भरती प्रक्रियेमुळे प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांशी सतत संपर्कात आहे. अनेक लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या आहेत आणि भारत त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारचा कडक इशारा परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही पुन्हा एकदा सर्व भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात भरती होण्याच्या कोणत्याही ऑफरपासून दूर राहण्याची कडक इशारा देत आहोत. कारण, हे एक अतिशय धोकादायक पाऊल आहे. अनेक एजन्सी किंवा दलाल रशियामध्ये नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांना आकर्षित करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात त्यांना थेट सैन्यात ढकलले जात आहे. सरकारने लोकांना अशा प्रलोभनात पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद ऑफरची त्वरित तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
लष्करी प्रशिक्षणाशिवाय हे लोक युद्धभूमीवर कसे पोहोचले? वृत्तानुसार, रशियामार्गे युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात पोहोचलेल्या भारतीयांमध्ये जम्मूचा 22 वर्षीय सुमित शर्मा आणि पंजाबचा गुरसेवक सिंग यांचा समावेश आहे. मॉस्को स्टेट लिंग्विस्टिक युनिव्हर्सिटीमध्ये भाषा अभ्यासक्रम घेत असलेल्या सुमित शर्माने सांगितले की, तो काही अतिरिक्त पैसे कमविण्यासाठी अर्धवेळ काम शोधू लागला. एका महिला एजंटने त्याला बांधकाम कामाचे आश्वासन दिले. परंतु, नंतर त्याला करारबद्ध करून थेट रशियन सैन्यात भरती करण्यात आले.
कोणत्याही लष्करी प्रशिक्षणाशिवाय, त्याला ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनच्या सेलीडोव्ह भागात पाठवण्यात आले. शर्मा म्हणतात की, आम्हाला सांगण्यात आले की, हे फक्त काम आहे. आता आमच्यावर लक्ष ठेवले जात आहे, आम्हाला बाहेर जाऊ दिले जात नाही. आमचे अनेक साथीदार गायब झाले आहेत, आम्ही असेही ऐकले आहे की, काही जण युद्धात मारले गेले आहेत. या सर्वांनी भारत सरकारला त्यांना येथून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.
15 भारतीय अडकले, काही जण बेपत्ता तरुणांच्या मते, या सापळ्यात सुमारे 15 भारतीय अडकले आहेत. त्यापैकी चार बेपत्ता आहेत. गुरसेवक सिंह म्हणाले की, त्यांच्यासोबत आलेल्या राजस्थानमधील एका तरुणाला फॉरवर्ड पोस्टवर पाठवण्यात आले होते आणि गेल्या चार दिवसांपासून तो संपर्कात नाही.
ही बाब महत्त्वाची आहे की, ऑगस्ट 2024 मध्ये रशियन दूतावासाने एक अधिकृत निवेदन जारी केले होते की, भारतीयांना आता सैन्यात भरती केले जाणार नाही. यापूर्वी जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. तरीही, आताच्या ताज्या वृत्तात या आश्वासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया या बातमीनंतर, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि रशियाशी सतत संपर्कात आहेत. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, गेल्या एका वर्षात अनेक वेळा सूचना जारी करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नोकरीचे आमिष दाखवून रशियन सैन्यात सामील होऊ नये असे स्पष्ट इशारे देण्यात आले आहेत. मंत्रालयाने पुन्हा लोकांना कोणत्याही संशयास्पद ऑफरपासून दूर राहण्याचे आवाहन केले.