पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बिहार

PM Narendra Modi : हा देशातील सर्व माता-बहिणींचा अपमान; पंतप्रधान मोदींनी साधला विरोधकांवर निशाणा

PM Modi Lashes Out At Opposition: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहार राज्य जीविका निधी क्रेडिट कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेडचे व्हर्च्युअल लाँच केले. या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना त्यांनी काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या विकासाचा मुख्य आधार महिलांचे सक्षमीकरण आहे. महिलांना अडथळ्यांपासून मुक्त करणे गरजेचे आहे. मात्र याच वेळी त्यांनी बिहारमधील काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावर झालेल्या घटनांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा - PM Narendta Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या मेड इन इंडिया चिपचं उद्घाटन

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जे घडले त्याची मी कल्पनाही केली नव्हती. राजद-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली. हा अपमान फक्त माझ्या आईचा नाही, तर देशातील माता, बहिणी आणि मुलींचा आहे. माझ्या आईचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. तरीदेखील तिचा गैरवापर राजकीय मंचावर करण्यात आला. माझी आई मला देशसेवेसाठी आशीर्वाद देऊन पाठवायची. आज ती या जगात नाही, पण तिच्याबद्दल अशा शब्दांचा वापर होणे अत्यंत वेदनादायक आहे. 

हेही वाचा - Fact Check: ATM मधून 500 रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत? व्हायरल बातम्यांवर सरकारने दिले स्पष्टीकरण

मी माझ्या देशासाठी दररोज, प्रत्येक क्षणी खूप कष्ट केले आहेत आणि माझ्या आईने यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मला भारत मातेची सेवा करायची होती. म्हणूनच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईने मला माझ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त केले. मी त्या आईच्या आशीर्वादाने निघालो. म्हणूनच, आज मला दुःख आहे की ज्या आईने मला देशसेवेचे आशीर्वाद दिले आणि मला इथे पाठवले, तिने मला स्वतःपासून वेगळे केले, असंही यावेळी मोदींनी नमूद केलं.