आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोध

National Election Commission: निकालाच्या इतक्या दिवसांनतर आरोप का?, राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचा सवाल

नवी दिल्ली: रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष गहन पुनरावलोकन (स्पेशल इंटेंसिव रिवीजन) प्रक्रियेवर आणि 'मत चोरी'च्या आरोपांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, आमच्यासाठी कोणताही सत्ताधारी पक्ष नाही किंवा विरोधी पक्ष नाही, तर सर्व समान आहेत. या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांनी केलेले 'मत चोरी'चे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 

राहुल गांधी काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगावर आरोप करत होते. यावर आज मतचोरीचे खोटे आरोप करुन संविधानाचा अपमान आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नसल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे.  15 दिवसांत त्रुटी सांगा, असे आवाहन निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना केले आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं. मात्र निकालाच्या इतक्या दिवसांनतर आरोप का? असा  सवाल निवडणूक आयोगाने केला आहे.  हेही वाचा: Kishtwar Cloudburst : चमत्कार ! 30 तास मलब्याखाली दबूनही सुभाष चंद्र जिवंत

'मतचोरीचे आरोप करुन संविधानाचा अपमान'  मतचोरीचे आरोप करुन संविधानाचा अपमान केला. खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांवर दिले आहे. मतचोरीचे आरोप चुकीचे आहेत. खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही. 15 दिवसांत त्रुटी सांगा असे आवाहन आयोगाने राजकीय पक्षांना केले आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलंय. निवडणूक आयोग पक्षांत भेद करत नाही. आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत.आमच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सारखेच असल्याचेही यावेळी आयोगाने सांगितले. 

'निकालाच्या इतक्या दिवसांनतर आरोप का?' मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, मतदारयाद्यांच्या फेरतपासणीसाठी आराखडा तयार आहे. मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये SIR आहे. 18 वर्षांवरील नागरिकांनी मतदान केलं पाहिजे. राजकीय पक्षांकडून आयोगाविरोधात भ्रम पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पुरावे मागितले पण मिळाले नाहीत. सर्व राजकीय पक्षांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी समोर आणाव्यात. भारतीय मतदारांना निशाणा बनवून राजकारण होत असल्याचे आयुक्तांनी म्हटले.  

पुढे बोलताना, बिहारमधील मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत. विनापरवानगी मतदारांचा फोटो वापरला. मतदारांनी स्वत: 28 हजार 370 हरकती घेतल्या आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया पारदर्शी आहे. मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निकालाच्या इतक्या दिवसांनतर आरोप का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोग मतदारांसोबत आहे. मतदारयादीत घोळ असल्यास तक्रार करा असेही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.