नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NEE

NEET PG 2025 Entrance Exam Postponed: नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

NEET PG 2025 Entrance Exam Postponed

NEET PG 2025 Entrance Exam Postponed: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG) 2025 प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. NEET PG परीक्षा दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

NBEMS ने सोमवारी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. एकाच शिफ्ट परीक्षेसाठी अधिक परीक्षा केंद्रांची व्यवस्था असल्याने, NEET PG 2025 च्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. NEET PG 2025 ही देशातील वैद्यकीय पदवीधरांसाठी प्रवेश परीक्षा आहे. 

हेही वाचा - Womens Asia Cup 2025: महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित; ACC चा मोठा निर्णय

नीट पीजी प्रवेश परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार होती. परंतु, आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. NBEMS ने NEET PG 2025 परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. तथापि, नीट परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, NEET PG प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.