देशात भाजपचा झेंडा अटकेपार! आता दिल्लीसह 19 राज्यांमध्ये BJP-NDA युतीचे सरकार
How Many States Is The BJP Government: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवून नवा इतिहास रचला आहे. दिल्लीत आता तब्बल 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. आतापर्यंत, 70 जागांपैकी भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे. या विजयासह, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी आता 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता गाजवणार आहे. आता दिल्लीसह 15 राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, गेल्या वर्षी आठ राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा समावेश होता. तसेच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. सिक्कीममध्ये भाजपची एसकेएमशी असलेली युती निवडणुकीपूर्वी तुटली.
हेही वाचा - 'आप'च्या पराभवानंतर दिल्ली सचिवालय सील उपराज्यपालांच्या आदेशानुसार करण्यात आली कारवाई
भाजप-एनडीए शासित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची यादी -
- उत्तर प्रदेश (भाजप)
- महाराष्ट्र (भाजप)
- मध्य प्रदेश (भाजप)
- गुजरात (भाजप)
- राजस्थान (भाजप)
- ओडिशा (भाजप)
- आसाम (भाजप)
- छत्तीसगड (भाजप)
- हरियाणा (भाजप)
- दिल्ली (भाजप)
- उत्तराखंड (भाजप)
- त्रिपुरा (भाजप)
- गोवा (भाजप)
- अरुणाचल प्रदेश (भाजप)
- मणिपूर (भाजप)
NDA युती असणारे राज्य -
- आंध्र प्रदेश (टीडीपी)
- बिहार (जेडीयू)
- मेघालय (एनपीपी)
- नागालँड (एनडीपीपी)
- सिक्कीम (एसकेएम)
- पुडुचेरी (AINRC)
दिल्लीत भाजप 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत -
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाचा निर्णायक पराभव केला आहे. भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून उदयास आलेल्या पक्षाला 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आल्यामुळे मोठा पराभव पत्करावा लागला आहे. प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांनी आपवर टीकेची तोफ डागली होती. त्यांनी आपचा उल्लेख 'आपदा' म्हणजे आपत्ती असा केला होता. आपमुळे दिल्लीकरांच्या धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.