ChatGPT Subscription In India: OpenAI आणि Reliance मध्ये करारासंदर्भात चर्चा! आता भारतात चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन होणार स्वस्त?
ChatGPT Subscription In India: भारतात एआय उपस्थिती वाढवण्यासाठी OpenAI रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करण्याची योजना आखत आहे. द इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार, ओपनएआय आणि मेटा भारतात चॅटजीपीटीचे वितरण सक्षम करण्यासाठी रिलायन्स जिओसोबत संभाव्य भागीदारीवर चर्चा करत आहेत. याव्यतिरिक्त, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ओपनएआय आणि मेटाचे मॉडेल स्थानिक पातळीवर चालवण्याच्या शक्यतांवर देखील चर्चा करत आहे. या उद्देशाने, कंपनी गुजरातमधील जामनगरमध्ये तीन गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर बांधण्याची योजना आखत आहे.
चॅटजीपीटीच्या सबस्क्रिप्शनची किंतत कमी होणार -
सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील ओपनएआय चॅटजीपीटीचा सध्याचा 20 डॉलर प्रति महिना सबस्क्रिप्शन प्लॅन 75-85 टक्क्यांनी स्वस्त करण्याचा विचार करत आहे. जर ही योजना लागू झाली, तर भारतातील वापरकर्त्यांना एआय सेवांचे फायदे परवडणाऱ्या दरात मिळू शकतील.
हेही वाचा - IPL 2025: आयपीएल मधून उद्योगपती मुकेश अंबानी किती कमवणार?
अहवालानुसार, रिलायन्स त्यांच्या एंटरप्राइझ ग्राहकांना API द्वारे ओपनएआयचे मॉडेल्स विकण्याच्या शक्यतांवर चर्चा करत आहे. याशिवाय, कंपनी भारतात ओपनएआयचे मॉडेल होस्ट आणि ऑपरेट करण्याची योजना आखत आहे जेणेकरून भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशात सुरक्षित ठेवता येईल.
जामनगर प्रकल्प जगातील सर्वात मोठा डेटा सेंटर -
दरम्यान, ब्लूमबर्गच्या मागील अहवालानुसार, रिलायन्स जामनगरमध्ये 3 गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर बांधण्याची योजना आखत आहे, जे सध्या जगातील सर्वात मोठ्या डेटा सेंटरपेक्षा अनेक पट मोठे असेल. या डेटा सेंटरची क्षमता मेगावॅटमध्ये मोजली जाते, जी सर्व्हर, कूलिंग आणि पायाभूत सुविधांना ते किती ऊर्जा प्रदान करू शकतात हे दर्शवते. जास्त मेगावॅट क्षमता म्हणजे जास्त संगणकीय शक्ती, जी एआय सारख्या उच्च-केंद्रित वर्कलोड प्रक्रिया हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जर OpenAI आणि Reliance मध्ये भागीदारी यशस्वी झाली, तर भारतातील एआय सेवांच्या उपलब्धतेत आणि विश्वासार्हतेत मोठा बदल होण्यास मदत होणार आहे.