Mouse in Kanpur Delhi Flight: कानपूर-दिल्ली विमानात उंदीर घुसल्याने घबराट; सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवले
Mouse in Kanpur Delhi Flight: कानपूर विमानतळावर रविवारी दिल्लीला जाणाऱ्या विमानात अचानक उंदीर दिसला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दिल्लीहून कानपूर विमानतळावर दुपारी 2:10 वाजता विमान पोहोचले. त्यानंतर हे विमान दुपारी 2:50 वाजता दिल्लीला रवाना होणार होते.
केबिनमध्ये उंदीर फिरताना दिसल्यावर, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विमान ताबडतोब थांबवण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. विमानतळ कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विमानात उंदीर शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री होईपर्यंत उड्डाण रद्द करण्यात आले.
हेही वाचा - GST 2.0 : 22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर, सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग
विमानतळाच्या लाउंजमध्ये प्रवासी सुरक्षितपणे बसले होते. काही प्रवाशांनी गैरसोयीवर नाराजी व्यक्त केली, परंतु बहुतेकांनी सुरक्षेच्या दृष्टीने एअरलाइनच्या निर्णयाला सहमती दर्शवली. या घटनेमुळे कानपूर-दिल्ली विमानाचे उड्डाण उशीराने झाले. एअरलाइन व्यवस्थापनाने सांगितले की प्रवाशांना सतत माहिती देत असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.