Ukraine Conflict: पंतप्रधान मोदी-इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यात चर्चा; युक्रेन युद्धावर तोडग्यावर दर्शवली सहमती
Ukraine Conflict: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर रोजी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यावर सहमती दर्शविली आणि या दृष्टीने संयुक्त प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान भारत-इटली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावरही दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली. तसेच गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, विज्ञान, शिक्षण, अंतराळ आणि दहशतवादविरोधी क्षेत्रांवर सविस्तर संवाद झाला.
व्यापारविषयक चर्चेत, 2026 मध्ये होणाऱ्या भारत-ईयू मुक्त व्यापार करारावर आणि एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसेच भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रोत्साहन देण्यावर सहमती झाली. युक्रेनमधील सध्याच्या संकटावर चर्चा करताना, 2025-29 या काळासाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखड्याअंतर्गत संबंध दृढ करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही नेत्यांनी संघर्षावर शांततामार्गाने तोडगा काढण्याची गरज अधोरेखित केली.
हेही वाचा -Gen-Z Meaning: जनरेशन Z म्हणजे कोण? कोणत्या वयोगटातील लोक या पिढीत येतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले की, 'पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी उत्कृष्ट चर्चा झाली. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचे आमचे संयुक्त वचन आम्ही पुन्हा अधोरेखित केले आणि युक्रेन संघर्ष लवकर संपवण्यासाठी सामायिक रस दाखवला. परस्पर फायदेशीर भारत-ईयू व्यापार करार अंतिम करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी इटलीच्या सक्रिय सहकार्याबद्दल आभार.'