पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षेशी स

पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार! मोठी घोषणा करण्याची शक्यता

PM Narendra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठी घोषणा करू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष मोदींच्या भाषणांकडे लागले आहे. या भाषणात मोदी कोणती घोषणा करतात? पाकिस्तानबाबत काही मोठा निर्णय मोदी जाहीर करतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज रात्री पंतप्रधानांच्या भाषणात मिळणार आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याला भारत जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदींचे आज रात्रीचे भाषण महत्त्वपूर्ण असणार आहे. उद्या देशभरात मॉक ड्रिल आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशवासीयांना काय आवाहन करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा -  देशभरात मॉक ड्रिल कुठे होणार? शहरनिहाय संपूर्ण यादी जाणून घ्या

देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल - 

केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक हवाई हल्ला किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास नागरिकांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार करणे हा या सरावाचा उद्देश आहे.

हेही वाचा -  उद्या देशभरात होणार 'मॉक ड्रिल'; नागरिकांनी काय करावे? काय करू नये? जाणून घ्या

पाकिस्तानची घाबरगुंडी - 

भारताच्या कारवायांमुळे पाकिस्तानच्या सैन्याची आणि सरकारची पूर्णपणे घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानला भीती आहे की, भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी करत आहे. यामुळेच सीमेवरील हालचाली वाढल्या असून पाकिस्तानमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.