नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने बँकांना लाखो

RBI Imposes Monetary Penalty on Two Banks: RBI ची देशातील 2 मोठ्या बँकांवर कारवाई! लाखोंचा दंड ठोठावला

RBI

RBI Imposes Monetary Penalty on Two Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर आरबीआय लक्ष ठेवते. यासोबतच RBI नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवरही कडक कारवाई करते. नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने बँकांना लाखो कोटींचा दंड ठोठावल्याचे अनेक वेळा घडले आहे. आता आरबीआयने देशातील दोन मोठ्या बँकांवर कडक कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर दंड ठोठावला आहे. या दोन बँका म्हणजे एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. 

RBI ने HDFC आणि पंजाब अँड सिंध बँकेला ठाठावला दंड -  

नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेला दंड ठोठावला आहे. आरबीआयने एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने पंजाब अँड सिंध बँकेला 68.20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हेही वाचा -1 मे पासून ATM मधून कॅश काढण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे! RBI ने Interchange Fee वाढवण्यास दिली मान्यता 

दंड आकारण्याचे कारण -  देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेला काही केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावला आहे. बँकेवर दंड ठोठावल्यानंतर, आरबीआयने एचडीएफसी बँकेला कामगिरी सुधारण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा - Digital Financial Service: डिजिटल वित्तीय सेवांचा वापर करण्यात महिलांचा सहभाग वाढला; नवीन अहवालात खुलासा

पंजाब अँड सिंध बँकेवर दंड ठोठावण्याचे कारण सांगताना, आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकांनी दिलेल्या मोठ्या कर्जांची माहिती एकाच ठिकाणी ठेवणे, सामान्य लोकांना बँकिंग सेवा प्रदान करणे आणि त्यांच्यासाठी बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाउंट (BSBDA) उघडणे याशी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल 68.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही बँकांवर दंड आकारल्याने बँकांच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना बँकेच्या सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळू शकतात.