RBI 10 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करणार! काय असेल खासियत? जाणून घ्या
रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा 500 आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे. या दोन्ही नोटांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, नवीन नोटा काही बदलांसह जारी केल्या जातील आणि सध्या चलनात असलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या चलनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
RBI ने शुक्रवारी सांगितले की, बँक लवकरच महात्मा गांधी (नवीन) श्रृंखलेतील 10 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करेल, ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. या नोटांची रचना सर्व बाबतीत महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील सध्याच्या 10 आणि 500 रुपयांच्या नोटांसारखीच आहे, असेही RBI ने निवेदनात म्हटले आहे. याचा अर्थ नवीन नोटांमध्ये कोणतेही मोठे बदल केले जाणार नाहीत.
जुन्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहणार -
आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, नवीन नोटा जारी केल्या तरीही, रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जारी केलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील. याचा अर्थ असा की दोन्ही प्रकारची विद्यमान चलने सध्याप्रमाणेच बाजारात फिरत राहतील. मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये आरबीआय गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी 6 वर्षे गव्हर्नर असलेल्या शक्तीकांत दास यांची जागा घेतली.
हेही वाचा - BHIM 3.0 लाँच! आता ''या'' प्रगत वैशिष्ट्यांसह डिजिटल पेमेंट करणे होणार सोपे
100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार -
दरम्यान, गेल्या महिन्यात आरबीआयने 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला बाजारात अनेक नवीन नोटा दिसू शकतात. आतापर्यंत केलेल्या घोषणेनुसार, रिझर्व्ह बँक 10, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा जारी करेल. या सर्व नोटांवर नवीन गव्हर्नर मल्होत्रा यांची स्वाक्षरी दिसेल.