Tarpaulin Covers, Mosques, Rang Panchami, Uttar Pr

उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या निमित्ताने मशिदींवर ताडपत्री, धार्मिक वाद होऊ नये म्हणून योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेश: रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा जपण्यासाठी उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संभलमधील मुस्लिम समाजाने पुढाकार घेत मिरवणुकीच्या मार्गातील दहा मशिदी ताडपत्रीने झाकण्याचे ठरवले आहे.

पोलिसांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या संमतीने नियमावली आखली आहे. त्यानुसार हिंदू समुदायाने दुपारी 2.30 वाजेपर्यंत रंगपंचमी साजरी करावी, त्यानंतर मुस्लिम समाजातील लोक नमाज पठण करतील. वाद टाळण्यासाठी दोन्ही समाजांत समन्वय साधण्यात आला आहे.

हेही वाचा: Holi celebration guidelines: सुरक्षेसाठी पोलिसांची 'या' गोष्टींवर बंदी जाणून घ्या संपूर्ण आदेश

संभलमधील शाही जामा मशीदही ताडपत्रीने झाकण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांचे रक्षण आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान होळीच्या निम्मिताने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. सगळी मंडळी सण साजरा करण्यासाठी वेगवेगळे नियोजन करत आहेत. आज होळीच्या निमित्ताने होळी पूजन व  रंगांसोबत  खेळून रंगपंचीमीची गाणी लावून सणाचा आनंद लुटत आहेत.