राहुल गांधी यांनी म्हटलं की, जर लोकसभा निवडणुकीत 1

‘देशात निवडणूक आयोगाचं अस्तित्व संपलय...'; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

Rahul Gandhi

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या 'वार्षिक कायदेशीर परिषद' या महत्त्वाच्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जबरदस्त हल्ला चढवला. आपल्या भाषणात त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'देशात आता निवडणूक आयोग मृत झाला असून त्याचे अस्तित्व संपले आहे.'

15 जागांवरील घोटाळ्यांमुळे मोदी पंतप्रधान झाले - 

राहुल गांधी यांनी म्हटलं की, जर लोकसभा निवडणुकीत 15 जागांवरील घोटाळे झाले नसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळालीच नसती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाला. दरम्यान, राहुल गांधींच्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'हमारा राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो!' मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना रोखत नम्रपणे उत्तर दिलं, 'मी राजा नाही, आणि मला राजाही व्हायचं नाही. मी 'राजा' या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाही.' 

हेही वाचा - ''सर्जिकल स्ट्राईक ते ऑपरेशन सिंदूर''; मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

निवडणूक आयोग अस्तित्वातच नाही - 

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला की, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम करायला हवे तसे तो करत नाही. निवडणूक आयोगाने तडजोड केली आहे. माझ्याकडे असे काही पुरावे आहेत जे देशाला दाखवू शकतात की निवडणूक आयोग आज निष्क्रिय झाला आहे. हे पुरावे शोधण्यासाठी आम्हाला सहा महिने लागले, असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा - ट्रम्प 25 वेळा म्हणाले, मी युद्धबंदी केली, मोदी मात्र...; राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

मी आगीशी खेळतो आणि यापुढेही खेळत राहीन - 

दरम्यान राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं की, प्रियंका गांधी यांनी मला सांगितले की, तू आगीशी खेळतो आहेस. त्यावर मी उत्तर दिलं की, हो, मला माहित आहे की मी आगीशी खेळतो आहे आणि यापुढेही खेळत राहीन. तुमच्यापैकी अनेकांसारखाच, मीही शेवटी आगीत अडकेन. पण मला माझ्या कुटुंबाने भ्याडांना घाबरू नका असे शिकवले आहे. राहुल गांधींचं हे भाषण काँग्रेसच्या आगामी रणनीतीची झलक दर्शवते. निवडणूक आयोगावर इतक्या थेट शब्दांत केलेला आरोप हा भारतीय राजकारणात एक मोठा घडामोडीचा भाग मानला जात आहे. यावर निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.