भारतात वाढतोय कोरोनाचा धोका! बाधितांची रुग्णांच्या संख्येने पार केला 6 हजारांचा टप्पा; 24 तासांत 6 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 48 तासांत 769 नवीन बाधित रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 6,133 झाली आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
केरळ बनले कोरोनाचे हॉटस्पॉट -
प्राप्त माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. केरळनंतर गुजरात, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. कोविड रुग्णांमध्ये वाढ लक्षात घेता, केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्राची तयारी -
केंद्र सरकार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मॉक ड्रिलद्वारे तयारीचा आढावा घेत आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 2 आणि 3 जून रोजी एक उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये आयसीएमआर, एनसीडीसी, ईएमआर आणि आयडीएसपीसह अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा - 'मी स्वतःचे बलिदान देत आहे...'; बकरी ईदनिमित्त 60 वर्षीय व्यक्तीने चिरला गळा
मृतांचा आकडा 65 वर पोहोचला -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती आणि ते घरीच बरे झाले. या वर्षी जानेवारीपासून 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 22 मे रोजी देशात फक्त 257 सक्रिय प्रकरणे होती, जी आता लक्षणीयरीत्या वाढली आहेत. आयडीएसपी अंतर्गत, राज्ये आणि जिल्ह्यांच्या पाळत ठेवणाऱ्या युनिट्स आयएलआय (इन्फ्लूएंझासारखे आजार) आणि एसएआरआय (गंभीर श्वसन संक्रमण) यांचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.