ऑगस्टमध्ये UPI, FASTag सह बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
New Rules from August 2025: उद्यापासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून देशभरात UPI, SBI क्रेडिट कार्ड आणि फास्टॅगशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे नियम थेट सामान्य नागरिकांवर परिणाम करणारे असून डिजिटल पेमेंट्स, ट्रान्झॅक्शन सवयी आणि वाहतूक खर्च यावर प्रभाव टाकतील.
UPI वापरावर मर्यादा -
राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI अॅप्ससाठी नवीन मर्यादा लागू केली आहे. 1 ऑगस्टपासून वापरकर्ते एका अॅपवर दिवसातून जास्तीत जास्त 50 वेळा बँक शिल्लक तपासू शकणार आहेत. पूर्वी यासाठी कोणतीही मर्यादा नव्हती. हा निर्णय व्यस्त वेळी सर्व्हरवरील लोड कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे.
हेही वाचा - म्हातारपणात मोठा निधी आणि करसवलत हवीय? निवृत्तीनंतर ELSS आणि SWP मुळे होईल डबल फायदा
SBI क्रेडिट कार्ड
स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी SBI कार्ड ऑगस्टमध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन नियम लागू करणार आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, एसबीआय कार्ड 1 ऑगस्टपासून विविध क्रेडिट कार्डवर ग्राहकांना देण्यात येणारी मोफत हवाई अपघात विम्याची सुविधा बंद करत आहे.
हेही वाचा - दरमहा 500 रुपये गुंतवा अन् निवृत्तीनंतरची चिंता मिटवा! काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या
FASTag साठी नवा वार्षिक पास -
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 15 ऑगस्टपासून FASTag वार्षिक पास सुरू करत आहे. या फास्टॅग वार्षिक पासची किंमत 3000 रुपये असेल. हा पास एका वर्षासाठी वैध असेल. या पासवर प्रवाशांना एका वर्षात जास्तीत जास्त 200 टोल प्लाझा ओलांडता येतील. या उपक्रमाचे उद्दिष्ट टोल पेमेंट सोपे करणे आणि महामार्गांवर नियमितपणे प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक किफायतशीर पर्याय प्रदान करणे आहे.