तमिळनाडू सरकारचा रुपया चिन्ह काढून टाकण्याचा निर्ण

'हे धोकादायक मानसिकतेचे लक्षण'; अर्थसंकल्पातून रुपया चिन्ह हटवल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची तामिळनाडू सरकारवर टीका

Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman Criticizes Tamil Nadu Govt: तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात रुपया या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजप याला राष्ट्रीय चिन्हाचा अनादर म्हणत आहे, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर असल्याचं सांगत आहे. तथापि, आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तामिळनाडू सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. 

देशाच्या एकतेला कमकुवत करणाऱ्या धोकादायक मानसिकतेचे लक्षण 

तमिळनाडू सरकारचा रुपया चिन्ह काढून टाकण्याचा निर्णय हा देशाच्या एकतेला कमकुवत करणाऱ्या धोकादायक मानसिकतेचे लक्षण आहे. रुपयाचे चिन्ह मिटवून, द्रमुक केवळ राष्ट्रीय चिन्ह नाकारत नाही तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही दुर्लक्ष करत असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - Rupee Symbol: रुपयाचे चिन्ह कोणी डिझाइन केले? DMK सोबत आहे खास संबंध

फुटाधिकारवाद्यांना चालना मिळेल - 

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'हे एका धोकादायक मानसिकतेचे लक्षण आहे जे देशाच्या एकतेला कमजोर करते आणि प्रादेशिक अभिमानाच्या नावाखाली फुटीरतावादी भावनांना प्रोत्साहन देते...रुपयाचे प्रतीक आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले ओळखले जाते. रुपयाचे चिन्ह जागतिक आर्थिक व्यवहारांमध्ये भारताची ओळख म्हणून काम करते. भारत जेव्हा यूपीआय वापरून सीमापार पेमेंटला प्रोत्साहन देत आहे, तेव्हा आपण खरोखरच आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय चलन चिन्हाला कमी लेखले पाहिजे का? असा सवाल निर्मला सीतारमण यांनी उपस्थित केला आहे 

हेही वाचा -  Tamil Rupee Symbol: केंद्र आणि तामिळनाडूमधील भाषेचा वाद वाढला! मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून वगळले रुपयाचे चिन्ह

अशा निर्णयांमुळे राष्ट्रीय एकता कमकुवत होते - 

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे की, 'खरं तर, इंडोनेशिया, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, सेशेल्स आणि श्रीलंका यासह अनेक देश अधिकृतपणे त्यांच्या चलनाचे नाव म्हणून 'रुपया' किंवा त्याचे मिश्रित नाव वापरतात...सर्व निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी संविधानानुसार शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून रुपयासारखे राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्या शपथेविरुद्ध आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते, असं सीतारमण यांनी म्हटलं आहे.