Start-up आयडिया आहे, पण पैसे नाहीत...; 2025 च्या अर्थसंकल्पातील सामान्य महिलेसाठीची 'या' योजना करतील तुमचं स्पप्न साकार
Schemes for Common Women In Budget 2025: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत 2025 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात, दीर्घ प्रतीक्षेनंतर, अखेर सीतारमण यांनी मध्यमवर्गाच्या इच्छा पूर्ण केल्या. देशभरात अशा अनेक महिला आहेत ज्यांना कोणता व्यवसाय करायचा याची कल्पना आहे, मात्र, तो व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे अर्थसहाय्य नाही. तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? होय कारण, आता तुमचं स्पप्न सत्यात उतरू शकतं. कारण, आता यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्पप्नांच्या दिशेने वाटचाल करू शकता. चला तर मग तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी बजेटमध्ये कोणती योजना आहे ते जाणून घेऊया...
अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणती योजना आहे?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत, विशेषतः ज्या महिला व्यवसाय सुरू करू इच्छितात परंतु त्यांना आर्थिक पाठबळ नाही त्यांच्यासाठी या योजना वरदानापैक्षा कमी नाहीत. जर तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हेही वाचा - डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला! काय आहे यामागचं कारण, फायदे आणि तोटे जाणून घ्या
नवीन उद्योजकता योजना; महिलांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज -
सरकार पाच लाख महिला आणि एससी-एसटी उद्योजकांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देईल. यासोबतच, सरकार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील देईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अर्ज करू शकतात. तथापि, ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. याशिवाय, केंद्र सरकार महिलांच्या प्रगती आणि सक्षमीकरणासाठी आधीच काही योजना राबवत आहे, ज्यामध्ये निधी देखील देण्यात आला आहे.
हेही वाचा - RBI MPC Meeting: उद्या सकाळी आरबीआय करणार मोठी घोषणा! कर्जापासून ते FD वरील व्याजदरात होऊ शकतो बदल
मुद्रा योजनेतून मिळणार हमीशिवाय कर्ज -
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) महिला कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. विशेष म्हणजे हे कर्ज तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.
- शिशु कर्ज: जर तुम्ही या श्रेणीमध्ये अर्ज केला तर तुम्हाला सुप्रिया कर्ज 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल.
- किशोर कर्ज: जर तुम्ही या श्रेणीमध्ये अर्ज केला तर तुम्हाला 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.
- तरुण कर्ज: जर तुम्ही या श्रेणीमध्ये अर्ज केला तर तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
स्टँड-अप इंडिया -
स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत, महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेषतः प्रोत्साहित केले जाते. या योजनेअंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. उद्योजकतेला चालना देण्यासाठी हे कर्ज अनुसूचित जाती/जमाती आणि महिलांना दिले जाते.
अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी अन्नपूर्णा योजना -
जर तुम्हाला अन्नाशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर अन्नपूर्णा योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते. या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार पुरुष उद्योजक नसून महिला उद्योजक असावी. हे कर्ज ज्यांना केटरिंग, टिफिन सर्व्हिस, रेस्टॉरंट, होम किचन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी आहे.