काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठा धक्का! 12 लाख ऍडव्हान्स बुकिंग रद्द; दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ थांबला आहे. या घटनेमुळे पर्यटकांनी केलेले 12 लाख आगाऊ बुकिंग रद्द करण्यात आले आहे. काश्मीर हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबर चौधरी यांनी याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यापर्यंत खोऱ्याला भेट देऊ इच्छिणाऱ्या परदेशी पर्यटकांसह 12 लाख पर्यटकांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत खोऱ्यातील हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये आगाऊ बुकिंग केले होते. पण या घटनेनंतर लगेचच पर्यटकांनी त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली. आज संध्याकाळपर्यंत सर्व बुकिंग रद्द झाले आहेत.
पर्यटकांकडून आगाऊ बुकिंग रद्द -
बाबर चौधरी यांनी सांगितले की, रामबनमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांनी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बुकिंग रद्द केल्या. पण मंगळवारी संध्याकाळी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच, उर्वरित बुकिंग रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
हेही वाचा - योग्य उत्तर देऊ...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राजनाथ सिंह यांचे महत्त्वपूर्ण विधान
बाबर यांनी पुढे सांगितले की, यावर्षी आम्हाला असे वाटत होते की पर्यटक मागील सर्व विक्रम मोडतील. कारण हिवाळा हंगाम पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीतही चांगला गेला होता आणि आता वसंत ऋतूच्या सुरुवातीलाही येथे चांगल्या संख्येने पर्यटक आले होते. ट्यूलिप गार्डन फक्त 26 दिवस खुले असताना 8.5 लाख पर्यटकांनी येथे भेट दिली होती. त्यामुळे आम्हाला खात्री होती की, आमचा उन्हाळी हंगामही विक्रम मोडेल. यासाठी आम्ही संपूर्ण नियोजन केले होते, जेणेकरून पर्यटकांना निवास आणि जेवणाबाबत कोणतीही अडचण येऊ नये.
पर्यटकांकडून सुरक्षेला प्राधान्य -
दरम्यान, या घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पर्यटक निश्चितच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेचं पर्यटकांनी त्यांचे आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरूवात केली आहे. आता प्रशासनाने येथे अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष गाड्या आणि अतिरिक्त विमानांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे परिस्थिती लवकरच सुधारावी अशीच आपण प्रार्थना करू शकतो, जेणेकरून पर्यटक पुन्हा कोणत्याही भीतीशिवाय येथे येऊ शकतील, असंही बाबर यांनी म्हटलं आहे.