भारतीय रेल्वे आता तिकिटांच्या किमती वाढवणार आहे. आ

रेल्वेने प्रवास करणे महागले! तिकिटांच्या किमतीत वाढ वाढ; 1 जुलैपासून लागू होणार नवीन दर

Indian Railways

Railway Fare Hike: ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता भारतीय रेल्वेने प्रवास करणे महाग होणार आहे. भारतीय रेल्वे आता तिकिटांच्या किमती वाढवणार आहे. आता तुम्हाला एसी आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. तथापि, काही श्रेणींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. ट्रेन तिकिटांच्या नवीन किमती 1 जुलै 2025 पासून लागू होतील. भारतीय रेल्वे कोणत्या तिकिटांमध्ये वाढ करणार आहे ते जाणून घेऊयात. 

द्वितीय श्रेणीच्या तिकिटांच्या किमतीत वाढ

नवीन नियमांनुसार, 1 जुलैपासून, सामान्य द्वितीय श्रेणीच्या 500 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी तिकिटाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, परंतु 500 किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी तिकिटाच्या किमतीत अर्धा पैसा प्रति किमी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, मेल एक्सप्रेस (नॉन-एसी) मध्ये प्रवास करणे देखील लोकांसाठी महाग होत आहे. आता प्रवाशांना या तिकिटावर प्रति किमी 1 पैसे द्यावे लागतील.

हेही वाचा - आता आधार असेल तरच बनवता येणार पॅन कार्ड; 'या' तारखेपासून लागू होणार नवीन नियम

एसी-क्लासने प्रवास करणे महागणार - 

दरम्यान, आता भारतीय रेल्वेने एसी कोचमधून प्रवास करणे देखील महाग केले आहे. तिकिटांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर, एसी क्लास तिकिटांची किंमत आता प्रति किमी 2 पैसे असेल. याशिवाय, शहरी गाड्यांच्या तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तथापी, मासिक हंगामी तिकिटांच्या किमतीतही वाढ करण्यात आलेली नाही. कोविडनंतर, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच आपल्या तिकिटांच्या किमती वाढवल्या आहेत. तसेच तिकिटांच्या किमतीत ही वाढ खूपच किरकोळ आहे.

हेही वाचा - एअर इंडियाची फ्लाइट रद्द झाल्यास 'अशा' प्रकारे मिळवा तिकिटाचे पैसे

तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम - 

यापूर्वी रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम बदलण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत तुम्हाला तुमचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे प्रवासाच्या 4 तास आधी कळू शकत होते, परंतु आता रेल्वे एका नवीन प्रणालीवर काम करत आहे. या अंतर्गत, कन्फर्म झालेल्या जागांसह चार्ट प्रवासाच्या 24 तास आधी जारी केला जाईल. ही नवीन प्रणाली 6 जूनपासून राजस्थानच्या बिकानेर विभागात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे.